Pune Cyber Crime | गंडविण्यासाठी सायबर चोरट्यांची अफलातून ‘आयडिया’; चित्रकाराला घातला 80 हजारांचा गंडा

पुणे : Pune Cyber Crime | लोकांना गंडा घालण्यासाठी सायबर चोरटे काय काय कल्पना लढवतील, हे काही सांगता येत नाही. यापूर्वी मैत्री करुन गिफ्ट पाठविल्याचे भासवून कस्टमच्या नावाने नागरिकांना लाखो रुपयांना लुटले जात असतानाच आता गंडविण्यासाठी सायबर चोरट्याने आणखी एक आयडिया अवलंबिली असल्याचे उघडकीस आले आहे. त्याद्वारे सायबर चोरट्याने एका चित्रकाराला ( Painter) तब्बल ८० हजारांची ‘टोपी’ घातली (Pune Cyber Crime) आहे.

याप्रकरणी एका ५४ वर्षाच्या चित्रकाराने दत्तवाडी पोलीस ठाण्यात Dattawadi Police Station (गु. र. नं. २४१/२१) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चित्रकार असून ते पर्वती पायथा (parvati pune) येथे राहतात. पायल पाठल असे नाव सांगणार्‍या एका महिलेचा त्यांना १ मे २०२० रोजी ई मेल आला होता. त्यात त्यांना एक फोटो दाखवून पेंटिंग काढायचे असल्याचे सांगितले गेले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यांच्या नावाने तामिळनाडु मर्कटाईन बँकेचा (Mercantile Bank of Tamil Nadu) एकूण १ लाख २८ हजार ५०० रुपयांचा चेक काढण्यात आला. या चेकचा फोटो त्यांना दुसर्‍या दिवशी पाठविण्यात (Pune Cyber Crime) आला.

त्यानंतर केल्विन ग्रे नाव सांगणार्‍याने त्यांना फोन करुन चेक कस्टम विभागात (customs department) अडकला असून तो सोडविण्यासाठी त्यांना वेळोवेळी पैसे भरण्यास सांगण्यात आले. १ लाख २८ हजार ५०० रुपयांच्या चेकच्या फोटोवर विश्वास ठेवून या चित्रकाराने तब्बल ८० हजार रुपये पाठविले. त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार (Pune Cyber Crime) अर्ज दिला होता. त्याचा प्राथमिक तपास होऊन आता तो गुन्हा (Pune Cyber Crime) दाखल झाला आहे.

हे देखील वाचा

Parambir Singh | ‘बेपत्ता’ परमबीर सिंह आणखी ‘गोत्यात’ ! आता अटकेची टांगती तलवार

BJP MP Raksha Khadse | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंविरूध्द निवडणूक लढविणार्‍या भाजपच्या खा. रक्षा खडसेंना मोठा धक्का

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल-डिझेलची चढती ‘कमान’ कायम; जाणून घ्या आजचे दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Cyber ​​Crime | Cyber ​​thieves idea to ruin; The painter put 80 thousand gangs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update