Pune Cyber Crime | फसवणूकीचा नवा फंडा ! पैसे पाठविल्याचा WhatsApp वरील बनावट Paytm मेसेज दाखवून फसवणूक

पुणे : Pune Cyber Crime | इतके दिवस सायबर चोरटे वेगवेगळे फंडे काढून लोकांना आपल्या जाळ्यात पकडून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक (Cheating) करीत असल्याचे आढळून आले आहे. आता अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे लोकांची विशेषत: व्यावसायिकांची फसवणूक करु लागले आहेत. त्यात आता आणखी एक नवा फंडा पुढे आला आहे. त्यामुळे व्यावसायिक, छोट्या मोठ्या दुकानदारांनी ऑनलाईन पैसे स्वीकारताना काळजी घेण्याची आवश्यकता (Pune Cyber Crime) आहे.

हांडेवाडी रोडवरील इंदिरानगर येथील पेट्रोलपंपावर हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आनंद गुलाब जवारे (वय ४५, रा. गुलटेकडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात Kondhwa Police Station (गु. र. नं. ९२१/२१) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सरबजीत अरजीत सिंग होरा (रा. ईशा एम्पायर, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने फिर्यादी यांना बनावट लेटर पॅडवर क्रेडिटवर डिझेल देण्यासंदर्भात विनंती पत्र लिहून देऊन फिर्यादीचा विश्वास संपादन (Pune Crime) केला. सिक्युरिटी करीता तिर्‍हाईत महिलेचा चेक दिला. २८ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर पर्यंत आरोपीने त्याच्या गाडीमध्ये फिर्यादीच्या पंपावरुन ३४ हजार ६५१ रुपयांचे डिझेल भरुन घेतले. फिर्यादी यांनी डिझेलचे पैसे मागितल्यावर आरोपीने फिर्यादी यांना त्यांचे व्हॉटसअ‍ॅपवर पेटीएमद्वारे पैसे पाठविल्याबाबत बनावट स्क्रिन शॉट पाठवून पैसे न देता फसवणूक केली. अशाच प्रकारे छोट्या व्यावसायिकांची अनेकदा फसवणूक होते. पैसे पाठविल्याचे सांगितले जाते. नेटचा प्रॉब्लेम असल्याचे सांगून पैसे पाठविल्याचा बनावट मेसेज दाखविला जातो. व्यावसायिक तो खरा मानतात. प्रत्यक्षात त्यांना पैसे मिळत नाही. हा फसवणूकीचा नवा फंडा (Pune Crime) वाढत चालला आहे.

हे देखील वाचा

Pune Petrol Price | ‘पेट्रोल-डिझेल’च्या दराचा दररोज नवीन ‘उच्चांक’; जाणून घ्या नवे दर

Chandrakant Patil | भाजपला हरवणे सोपे नाही, BJP चा राष्ट्रवादीला इशारा

Shivajirao Bhosale Bank Fraud | शिवाजीराव भोसले बँक आर्थिक घोटाळा प्रकरणात साताऱ्यातून आणखी एकाला अटक

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Cyber ​​Crime | New Fraud Funda ! Fraud by showing fake Paytm message on WhatsApp kondhwa police station case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update