Pune Cyber Crime | सोशल मिडियावर गाद्या विकणे आले अंगाशी ! महिलेला सायबर चोरट्यांनी घातला साडेपाच लाखांना गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Cyber Crime | टीव्हीवरील जाहिराती पाहून फेसबुकवर (Facebook) गाद्या विक्री करण्याचा एका महिलेचा प्रयत्न चांगलाच अंगाशी आला आहे़ सायबर चोरट्यांनी (Pune Cyber Crime) या गाद्या खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करुन त्यांची ५ लाख ४३ हजार ६१ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी मुंजाबावस्ती येथील एका ४८ वर्षाच्या महिलेने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिलेने फेसबुकवर गाद्या विक्रीची जाहिरात दिली होती. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून आपण लष्करात नोकरीस असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.(Pune Cyber Crime)

 

या गाद्यांची खरेदीची रक्कम क्युआर कोडद्वारे पाठवित आहे, असे सांगितले. फिर्यादीस वेळोवेळी वेगवेगळे क्युआर कोड पाठवून त्याद्वारे पेमेंट प्रोसेस करावयास सांगून त्यांच्या खात्यातून ५ लाख ४३ हजार ६१ रुपये काढून घेऊन फसवणूक (Cheating) केली. गेल्या वर्षी २२ ते २७ डिसेबर २०२० मध्ये झालेल्या या घटनेची फिर्यादी यांनी आता तक्रार दिली असून पोलीस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Cyber ​​Crime | sell mattresses on social media ! cheating case of woman worth of 5.5 lacs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | अनाधिकृत बांधकामावरील कारवाईला विरोध करुन पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न; पुण्याच्या भारती विद्यापीठ परिसरातील घटना

Pune Crime | कस्टम अधिकारी असल्याची बतावणी करुन स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली 84 लाखांना गंडा; पुण्याच्या शिवाजीनगर गावठाणातील घटना

Tata Group | टाटाची शानदार कामगिरी ! ‘या’ कंपनीकडून मिळतोय एका वर्षात 180 % परतावा; यात राकेश झुनझुनवालाचीही अधिक गुंतवणूक