Pune Cyber Crime | लग्नाचे आमिष दाखवून महिलेला 16 लाखांना घातला गंडा; डेबीड, क्रेडिट कार्डची माहिती मिळवून केला गैरव्यवहार

पुणे : Pune Cyber Crime | मॅट्रोमोनी (matrimony) साईट तसेच सोशल मिडियावरुन झालेल्या ओळखीतून लग्नाचे आमिष दाखवून तरुणतरुणींची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. ज्याला आपण प्रत्यक्ष भेटलोही नाही, अशाने लग्नाचे आमिष दाखविल्यावर त्यावर भाळून आपली लाखो रुपयांची कमाई त्याच्या स्वाधीन करण्याचा प्रकार उघडकीस येत आहे. अशा प्रकारचा एक गुन्हा सायबर पोलिसांनी दाखल केला आहे. तिला इंटरनेटवरील ओळखीतून तब्बल १६ लाख २६ हजार रुपयांना गंडा (Pune Cyber Crime) घालण्यात आला आहे.

याप्रकरणी एका ३७ वर्षाच्या महिलेने सायबर पोलिसांकडे (Pune Cyber Police) फिर्याद दिली आहे. हा प्रकार १४ मार्च २०१८ पासून सुरु होता. आरोपी आणि फिर्यादी यांची मोबाईल व इंटरनेटच्या माध्यमातून ओळख झाली. आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर प्रोजेक्टच्या कामासाठी पैसे लागणार असल्याचे सांगून त्यांच्याकडून थोडे थोडके नव्हे तर तब्बल १६ लाख २६ हजार ९४२ रुपये बँक खात्यास भरणा करण्यास सांगितले. तसेच फिर्यादी यांच्या बँक खात्याची डेबीट, क्रेडिट कार्ड विश्वासाने मिळवून त्यातून गैरव्यवहार केले, म्हणून गुन्हा (Pune Cyber Crime) दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा

Gold Price Update | सोन्याच्या किमतीत मोठ्या घसरणीमुळे ग्राहक खुश ! 9926 रुपयांपर्यंत स्वस्त झाले सोने; जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट गोल्डचे नवीन दर

Pune Crime | पुण्यातील औंधमध्ये वडिलोपार्जित मालमत्तेसाठी मोठ्या बहिणीला पेटविले

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Cyber ​​Crime | 16 lakh to a woman on the pretext of marriage; Debit, credit card information fraud

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update