Pune Cyber Crime | 18 बँकांमधील 41 खात्यांद्वारे सायबर चोरट्याने घातला डॉक्टराला दीड कोटींना गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  Pune Cyber Crime | विमा पॉलिसीचे पेसे परत करुन देतो, असे सांगून वेगवेगळ्या 18 बँकांमधील 41 बँक खात्यांवर पैसे पाठविण्यास भाग पाडून एका डॉक्टरची तब्बल 1 कोटी 49 लाख 44 हजार 400 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 2017 पासून सुरु होता. (Pune Cyber Crime)

 

याप्रकरणी बिबवेवाडीत (Bibvewadi) राहणार्‍या एका 57 वर्षाच्या डॉक्टरांनी सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) फिर्याद दिली आहे.
सायबर चोरट्यांनी 2013 पासून फिर्यादी डॉक्टरांना वेगवेगळ्या मेल आयडीवरुन तसेच प्रत्यक्ष कॉल करुन संपर्क करत होते.
त्यांना पॉलिसीचे पैसे परत करुन देतो, असे खोटे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. (Pune Cyber Crime) त्यांना वारंवार वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे भरायला सांगितले.
त्यांना प्रत्येक वेळी वेगवेगळी आश्वासने देऊन त्यांना पैसे भरायला भाग पाडले. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांना ब्लॅकमेलिंग करुन त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली.
अशा प्रकारे त्यांच्याकडून सायबर चोरट्यांनी 18 वेगवेगळ्या बँकांमधील 41 खात्यांमध्ये 1 कोटी 49 लाख 44 हजार 400 रुपये भरायला भाग पाडून फसवणूक केली.
पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण (Police Inspector Ankush Chintamani) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Cyber ​​Crime | Cyber ​​thief smuggled Rs 1.5 crore through 41 accounts in 18 banks pune cyber crime

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

District Central Cooperative Bank | पुण्यासह ‘या’ 4 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका लवकरच; हाय कोर्टाची परवानगी

Anil Kapoor | अनिल कपूर गंभीर आजाराच्या उपचारासाठी जर्मनीमध्ये; व्हिडिओ झाला व्हायरल

Hingoli Accident News | नोकरीच्या पहिल्याच दिवशी घरी परतताना झालेल्या अपघातात 2 चुलतभाऊ ठार