Pune Cyber Crime | पुण्यात आरोग्य विभागाच्या पेपर फुटीप्रकरणी गुन्हा दाखल; 100 पैकी 92 प्रश्न सारखे असल्याचे तपासणीत निष्पन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime | आरोग्य विभागाच्या (Health Department) वतीने वेगवेगळ्या पदासाठी घेतलेल्या परिक्षेपैकी 31 ऑक्टोबर रोजीचा ड संवर्गातील पदाच्या निवडीच्या लेखी परिक्षेचा पेपर फुटल्याचे अखेर आरोग्य विभागाने मान्य केले आहे. आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर (Smita Karegaonkar, Chief Administrative Officer, Health Department) यांनी याबाबत सायबर पोलिसांकडे (Pune Cyber Crime) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी IPC 406, 420, 34 सह विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणार्‍या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम कलम 6, कलम 8 नुसार अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

आरोग्य विभागाने एकूण 7 हजार 343 पदांसाठीची परीक्षा जाहीर केली होती. तेव्हापासून ही परीक्षा वादग्रस्त ठरली आहे. परीक्षेचा व्यवस्था न्यास या कंपनीकडे सोपविली होती. या कंपनीविषयीही अनेक आक्षेप नोंदविले गेले होते. ढसाळ व्यवस्थेमुळे ऐन परीक्षेच्या वेळी सोयीसुविधा उपलब्ध न झाल्याने काही परीक्षा पुढे ढकलण्याची पाळी आली होती. (Pune Cyber Crime)

आरोग्य विभागातील ड संवर्गातील पदाच्या निवडीची लेखी परीक्षा 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 ते 4 वाजेच्या दरम्यान होती.
परंतु, या परीक्षेचा पेपर त्यादिवशी सकाळी साडेआठ वाजताच व्हायरल झाला होता. असंख्य मुलांना हा पेपर व्हॉटसअपवर मिळाला होता.
एका कागदावर पेनाने प्रश्न व उत्तरे लिहिलेला पेपर फुटला होता.
त्यामुळे पेपर फुटल्याची तक्रार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

 

परंतु, त्याबाबत आरोग्य विभागाकडून कोणतीही माहिती न दिल्याने गुन्हा दाखल झाला नव्हता.
आता स्वत: आरोग्य विभागाने पेपर फुटल्याचे मान्य केले आहे.
या लेखी परीक्षेच्या 100 प्रश्नांपैकी 92 प्रश्न व उत्तरे लिखित स्वरुपात माहितीचा पेपर फोडून ती माहिती प्रसारित करुन शासनाची व परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.

 

Web Title :- Pune Cyber ​​Crime | Health department files case in Pune; The investigation concluded that 92 out of 100 questions were similar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Dhananjay Munde | पंकजाताईबाबत धनंजय मुंडेचं सुचक वक्तव्य; म्हणाले – ‘रुसून राहिले माझ्या जवळचे, मी कुणाला कळलोच नाही’

Modi Government | मोदी सरकारच्या ‘या’ योजनेचा 31 मार्चपर्यंत मिळेल लाभ; जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया अन् कोणाला होणार फायदा

District Central Cooperative Bank | पुण्यासह ‘या’ 4 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका लवकरच; हाय कोर्टाची परवानगी