Pune Cyber Crime | ऑनलाईन मागविलेल्या वस्तूचा 5 रुपये दंड पडला 2 लाखांना; ड्रेस मागविला लखनौहून पैसे गेले आसाम, बंगालच्या सायबर चोरट्यांकडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Cyber Crime | ऑनलाईन मागविलेले ड्रेस न पोहचल्याने गुगलवरुन कुरीयन कंपनीचा मोबाईल शोधला़ त्याने ५ रुपये दंड भरण्यासाठी सांगून कस्टमर सपोर्ट अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगितले. त्यांनी ५ रुपये दंड भरण्याचा प्रयत्न केला परंतु, तो अयशस्वी झाला. त्यानंतर त्यांचे ड्रेस घरपोच मिळाले. त्याचवेळी त्यांच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या वेळी ६ व्यवहार होऊन तब्बल १ लाख ९५ हजार ९९९ रुपये ऑनलाईन काढले जाऊन फसवणूक झाली. ऑनलाईन मागविलेले ड्रेस पाहण्याची घाई महिलेला २ लाख रुपयांना पडले. (Online Fraud)

याबाबत नांदेड सिटी (Nanded City) येथे राहणार्‍या ४७ वर्षाच्या शिक्षिकेने हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ५७/२४) दिली आहे. फिर्यादी यांनी अनुराग यादव लखनऊ ड्रेसेस येथून ऑनलाईन ड्रेसेस मागविले होते. त्याचे पैसेही पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पार्सल श्री मारुती कुरीअरने पाठविल्याचे कळविले. दोन दिवसानंतरही पार्सल न आल्याने त्यांनी कुरीअर कोठे आले, हे टॅक करण्याचा प्रयत्न केला. (Pune Cyber Crime)

पण, ते टॅक होत नसल्यामुळे त्यांनी गुगलवरुन श्री मारुती या कुरीअर कंपनीचा कस्टमर केअर नंबर सर्च केला. त्या नंबरवर त्यांनी फोन करुन पार्सलची चौकशी केली. तेव्हा त्याने आपले पार्सल येऊन परत गेल्याचे सांगितले. तुम्हाला परत हवे असेल तर त्याचा ५ रुपये दंड भरावा लागेल, असे सांगितले. त्यांना एक अ‍ॅपची लिंक पाठवून दिली. ते डाऊनलोड करुन अ‍ॅपद्वारे ५ रुपये पाठवा असे सांगितले. त्यांनी ते अ‍ॅप डाऊनलोड करुन ५ रुपये पाठविण्याचा प्रयत्न केला परंतु, पैसे गेले नाही. तेव्हा त्यांनी पुन्हा कस्टमर केअरवर फोन करुन सांगितले. तेव्हा समोरच्या व्यक्तीने पैसे थोड्या वेळाने पाठविले तरी चालेल, असे बोलून फोन कट केला. (Cheating Fraud Case)

त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यांनी मागविलेले कपड्याचे पार्सल आले. त्यामुळे त्यांनी ५ रुपये काही पाठविले नाही.
त्यानंतर सायंकाळी त्यांच्या मोबाईलवर एका मागोमाग त्यांच्या खात्यातून पाच वेळा पैसे काढून घेण्यात आले.
ते दीपक सिंह नावाच्या व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सफर झाले होते. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या दुसर्‍या बँक खात्यातून
९९ हजार ९९९ रुपये काढून घेण्यात आल्याचा मेसेज आला. त्यांच्या मुलाने मोबाईलमधील कस्टमर सपोर्ट अ‍ॅप
काढून टाकल्यानंतर हा प्रकार थांबला.

फिर्यादी यांनी चौकशी केल्यावर त्यांच्या खात्यातून ९९ हजार ९९९ रुपये मयान अली या आसाम मधील सेंट्रल
बँकेच्या खात्यात गेले. तसेच ९६ हजार रुपये पश्चिम बंगालमधील चंदीपूर दक्षिणमधील इंडुसीड बँकेचा खातेदार दीपक
सिंह याच्या खात्यात गेल्याचे दिसून आले. पोलीस निरीक्षक सचिन वंगाडे तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mundhwa Police | पार्कींग केलेल्या रिक्षांचे डिस्कटायर चोरणाऱ्यांना मुंढवा पोलिसांकडून अटक

Manoj Jarange Patil On Maharashtra Govt | ‘सरकारने शिष्टमंडळ पाठवून फसवणूक केली, महाराष्ट्रभर गुन्हे दाखल करू’ – मनोज जरांगे

PM Modi Yavatmal Visit | PM मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, ‘या’ जिल्ह्यात महिला मेळाव्यासह विविध कार्यक्रम, PM Kisan च्या १६ व्या हप्त्याचे वितरण करणार

Amit Shah On Uddhav Thackeray | अमित शाह यांची इंडिया आघाडीवर जोरदार टीका, उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असे वाटते…

Sanjay Raut On Amit Shah | अमित शहांच्या घराणेशाहीच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर, ”जय शाहने विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर्स मारलेत का?”