Pune Cyber Crime | सोशल मीडियावर ओळखीतून ज्येष्ठ महिलेला ५७ लाखांचा गंडा

पुणे : Pune Cyber Crime | समाजमाध्यमावरील ओळखीतून सिंहगड रस्ता भागातील ज्येष्ठ महिलेला सायबर चोरट्यांनी ५७ लाख ७९ हजार रुपयांचा गंडा (Fraud Case) घातल्याचे उघडकीस आले आहे. सायबर चोरट्यांनी परदेशातून ज्येष्ठ महिलेला दोन कोटी रुपये पाठविण्याचे आमिष दाखविले होते. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला सिंहगड रस्ता (Sinhagad Road, Pune) परिसरात राहायला आहेत. ज्येष्ठ महिलेच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता. त्या वेळी एका चोरट्याने त्याचे नाव एरिक ब्राऊन (Eric Brown) असे सांगितले होते. परदेशात वास्तव्यास असल्याची बतावणी चोरट्यांनी केली होती. ज्येष्ठ महिलेला परदेशातून दोन कोटी रुपये भेट म्हणून पाठविण्यात येणार असल्याचे आमिष चोरट्यांनी दाखविले होते. (Pune Cyber Crime)

त्यानंतर ज्येष्ठ महिलेच्या मोबाइल क्रमांकावर आशा कुमारी (Asha Kumari) नावाच्या महिलेने संपर्क साधला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातून (Reserve Bank of India) बोलत असल्याची बतावणी तिने केली. रिझर्व्ह बँकेशी साधर्म्य असलेला ईमेल महिलेला पाठविण्यात आला. ज्येष्ठ महिलेला आमिष दाखवून तिला वेळोवेळी ५७ लाख ७९ हजार ३०० रुपये बँकखात्यात जमा करण्यास सांगितले. दरम्यान, महिलेला दोन कोटी रुपयांची रक्कम पाठविण्यात आली नाही. फसवणूक (Cheating Case) झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यानंतर या प्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे (Senior Police Inspector Kumar Ghadge) तपास करत आहेत.

Web Title :- Pune Cyber Crime| 57 lakhs to an elderly woman through an acquaintance on social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा