कॉसमॉस बँकेच्या सायबर हल्यातील साडे पाच कोटी हॉंगकॉंगमधून ‘रिटर्न’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गणेशखिंड येथील कॉसमॉस बँकेच्या मुख्य सर्व्हरवर सायबर हल्लाकरून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने हॉंगकॉंग येथून साडे पाच कोटींची रक्कम परत मिळवली आहे. आता पर्यंत याप्रकरणात सर्वाधिक रक्कम मिळविण्यास पोलिसांना यश आले आहे.

याप्रकरणी चातुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हात पोलिसांनी 18 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडुनही रक्कम जप्त केली आहे.

सायबर हल्याप्रकणात पोलिसांनीकडून एसआयटीची टीम नेमण्यात आली आहे. त्यानुसार या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. दरम्यान सायबर चोरट्यानी हल्ला करून वेगवेगळ्या देशात हे पैसे वळविण्यात आले होते. तर वेगवेगळ्या शहरामधुन एटीएम केंद्रातून पैसे काढण्यात आले होते.

दरम्यान ज्या देशात पैसे पाठविण्यात आले होते. तेथील पोलीस आणि शासनासोबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार हॉंगकॉंग पोलिसांशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. तसेच, येथील हॅनसेंग बँकेला देखील संपर्क केला होता. तर हॉंगकॉंग पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली होती. त्याचा तपास हॉंगकॉंग पोलिस दलातील डिटेकिव्ह लुंग हे करीत होते.

तपासादरम्यान भारत सरकारने दूतवासामार्फत हॉंगकॉंग दुतवासाशी पत्रव्यवहार सूरु होता. त्यादरम्यान लुंग यांच्याकडून तपास काढून तो पॅग यान लोक यांच्याकडे दिला होता. त्यांनी तपास करून रक्कम गोठविली. तसेच पुणे पोलिसांशी संपर्क करून याची माहिती दिली. त्यानुसार पुणे पोलीस व कॉसमॉस बँकेने हॉंगकॉंग येथील न्यायालयात पैसे मिळण्यासाठी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पार पाडल्यानंतर सोमवारी कॉसमॉस प्रकरणातील 5 कोटी 72 लाख रुपयांची रक्कम परत मिळाली आहे.

पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

You might also like