Pune Cyber Crime | आलेल्या मेसेजवर क्लिक करणे माजी सैनिकाला पडले सव्वाचार लाखांना; दिघी पोलीस ठाण्यात FIR

पुणे : Pune Cyber Crime | बँकेतून आलेला मेसेज समजून त्यावर क्लिक करणे एका माजी सैनिकाला (Ex Military Man) चांगलेच महागात पडले. त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख २४ हजार रुपये काढून घेऊन फसवणूक (Cheating Case) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे सायबर चोरट्यांनी (Pune Cyber Crime) त्यांना तुमची वैयक्तिक बँकेची माहिती कोेणासाहेबत शेअर करु नका, असे सांगून त्यांच्याकडून सर्व माहिती काढून घेऊन फसवणूक (Fraud Case) केल्याचे निष्पन्न झाले आहे़

याप्रकरणी लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकाने दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३८५/२२) दिली आहे. फिर्यादी यांच्या मोबाईलवर इंग्रजीमध्ये एक मेसेज आला. त्यात तुमचे एस बी आय मधील खाते आज बंद होणार आहे. तुम्ही तुमचे PAN Card अपडेट करा, या संदेशाबरोबर एक लिंक होती. त्या लिंकवर फिर्यादी यांनी क्लिक करुन त्यावर इंटरनेट आयडी व पासवर्ड टाकला. त्यानंतर त्यांना एक ओटीपी आला. त्यांनी तो ओटीपी टाकता. त्यानंतर त्यांच्या खात्यातून २४ हजार ९९९ रुपये व २५ हजार रुपये डेबीट झाल्याचा मेसेज आला.

त्या मेसेजवर एका मोबाईल नंबरचा उल्लेख होता. त्यांनी त्यावर संपर्क साधला असता, त्यांचा फोन कट केला.
त्यानंतर त्यांना एक मोबाईल आला. एस बी आय बीकेसी बांद्रा कॉम्पलेक्स मुंबई येथून बोलत असल्याचे सांगितले.
तुमचे जे आता २५ हजार रुपये डेबीट झाले. ते आठ ते दहा तासात रिफंड येतील, असे सांगत़ तुम्ही पुन्हा तुमची वैयक्तिक बँकेची माहिती कोणासोबतही शेअर करु नका, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
मी एस बी आय बँकेमधून बोलत असून मी तुम्हाला जे सांगेन त्याप्रमाणे तुम्ही करत रहा असे सांगितले. (Pune Cyber Crime)

त्याप्रमाणे फिर्यादी करत गेले. त्यात त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कासारवाडी येथील ५ लाखांच्या मुदत ठेवीवर
३ लाख ७५ हजार रुपये कर्ज घेतले असल्याचा मेसेज त्यांना आला.
त्यानंतर काही वेळातच त्यांच्या मुदत ठेवीच्या खात्यातून २ लाख ९९ हजार ९९९ रुपये व ७५ हजार रुपये डेबीट
झाल्याचा मेसेज आला.
त्यांची एकूण ४ लाख २४ हजार रुपये फसवणूक करण्यात आली.
दिघी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Cyber ​​Crime | Clicking on the received message cost the ex-serviceman four lakhs; FIR in Dighi Police Station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Atul Bhatkhalkar | ‘प्रकरण अगदी वाया गेलेलं आहे… हे तर भोंदू हृदयसम्राट’, भाजप नेत्याची शिवसेनेवर बोचरी टीका

Allu Arjun Net Worth | अबब ! आलिशान बंगला, लग्झरी गाड्या, महिन्याला ‘इतके’ कोटी कमावतो ’पुष्पा’ स्टार अल्लू अर्जुन