Pune Cyber Crime | ‘जीवनसाथी’ शोधण्याच्या नाद खुळा ! लग्नासाठी स्थळ दाखविण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची 16 लाखाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एका ज्येष्ठ नागरिकाने (Senior Citizen) लग्नासाठी जीवनसाथी डॉट कॉम (Jeevansathi) या वेबसाईटवर नावनोंदणी केली होती.
त्याचा गैरफायदा घेऊन सायबर चोरट्यांनी (Pune Cyber Crime) दुसर्‍या वेबसाईटवर नावनोंदणी करायला लावून स्थळ दाखविण्याच्या नावाखाली तब्बल १६ लाख ३२ हजार रुपयांना गंडा (Fraud Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे (Online Fraud With Senior Citizen).
या प्रकरणी वाघोली (Wagholi) येथील एका ६३ वर्षाच्या नागरिकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे MSEB मधून निवृत्त झाले आहेत.
त्यांचे पत्नी व मुलांशी पटत नसल्याने ते वेगळे राहतात. उतार वयात कोणीतरी सोबत असावे,
यासाठी त्यांनी जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर लग्नासाठी नावनोंदणी केली होती.
त्यानंतर त्यांना लव्ह इन या वेबसाईटवरुन संपर्क साधण्यात आला व नावनोंदणीसाठी ९२० रुपये भरण्यास सांगितले.
त्यानुसार त्यांनी पैसे भरले.
त्यानंतर आरोपींनी वेगवेगळ्या मोबाईलवरुन फोन करुन त्यांना स्थळ दाखविण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी १६ लाख ३२ हजार ५७९ रुपये ऑनलाईन घेतले.
मात्र कोणतेही स्थळ दाखविले नाही अथवा पैसे परत न करता फसवणूक (Cheating Case) केली. (Pune Cyber Crime)

उतार वयात सोबत असावी, म्हणून त्यांनी केलेला हा प्रयत्न चांगलाच अंगलट आला असून सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांवर सायबर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
लोणीकंद पोलीस तपास करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Cyber ​​Crime | cyber crime online fraud case of Rs 16 lakh wagholi senior citizen in
the name of showing a place for marriage lonikand police station pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा