Pune Cyber Crime | पुण्यात महिला बँक कर्मचार्‍यालाच सायबर चोरट्यांनी घातला गंडा ! 4 हजारांसाठी गमावले 64 हजार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime | आपल्या बँक खात्याची, गोपनीय नंबर कोणाला सांगू नका, असे बँका आणि पोलिसांकडून सातत्याने सांगितले जाते. असे असले तरी ते लोकांच्या गळी उतरेलच असे नाही. बँकेत काम करणारी एक महिला कर्मचारी बँकांकडून ग्राहकांना सांगणार्‍या खबरदारी स्वत: मात्र विसरली आणि सायबर चोरट्यांनी (Pune Cyber Crime) तिचे बँक खाते रिकामे करीत गंडा घातला.

याप्रकरणी पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे राहणार्‍या एका ३४ वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (chaturshringi police station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार गणेशखिंड रोडवरील (Ganesh Khind Road) अ‍ॅक्सीस बँकेत (Axis Bank) २५ ऑक्टोबर रोजी घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या अ‍ॅक्सीस बँकेत नोकरी करतात. त्यांनी २०२१ मध्ये नोकरी डॉट कॉमवर रजिस्ट्रेशन करुन त्यांची पेड सर्व्हिस घेतली होती. त्याचे त्यांनी ४ हजार रुपये भरले होते. त्यांना २५ ऑक्टोबर रोजी एका फोन आला. चोरट्याने त्यांना आपण नोकरी डॉट कॉमवरुन बोलत असल्याचे सांगितले. तुमचे पैसे रिटर्न करण्यात येत आहेत, असे सांगून त्यांच्या मोबाईलवर लिंक पाठविली. फिर्यादी यांना डेबीट कार्डची (Debit Card) माहिती भरण्यास सांगितल़े. आपली माहिती कोणाला देऊ नये, हा संदेश त्या ४ हजार रुपये मिळणार, या विचारात विसरुन गेल्या. त्यांनी माहिती भरुन पाठविली. त्याबरोबर त्यांच्या अ‍ॅक्सीस बँक खात्यातून सायबर चोरट्यांनी ६४ हजार ६०० रुपये काढून घेऊन फसवणूक केली आहे. त्यांनी पोलिसांकडे (Pune Cyber Crime) तक्रार अर्ज केला होता. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : Pune Cyber Crime | Cyber thieves duped a female bank employee in Pune! 64 thousand lost for 4 thousand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती;
कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार;
इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख,
जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी