Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांचा नेत्र चिकित्सक महिलेला दोन लाखांना गंडा; क्रेडिट कार्डला सर्व्हिस चार्ज लागत असल्याचे सांगून केली फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime | बँका, पोलीस आपला OTP, गोपनीय क्रमांक कोणाला सांगू नका, यामुळे तुमची फसवणूक होईल, असे वारंवार सांगून जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत असतात. असे असले तरी उच्च शिक्षितांमध्ये सायबर साक्षरता कमी असल्याचा वारंवार प्रत्यय येताना दिसून येत आहे. क्रेडिट कार्डवर इन्शुरन्स व इतर सर्व्हिस चार्जेस लागले असल्याचे सांगून गोपनीय क्रमांक घेऊन एका महिलेची तब्बल १ लाख ९७ हजार ८२७ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Cyber Crime)

 

याप्रकरणी हडपसरमधील (Hadapsar) एका ३७ वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २५०/२२) दिली आहे. हा प्रकार ७ एप्रिल २०२२ रोजी घडला होता. (Pune Cyber Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला एका हॉस्पिटलमध्ये नेत्र चिकित्सक आहेत. त्यांना ७ एप्रिल रोजी मोबाईलवर फोन आला. त्याने तुमचे क्रेडि कार्डवर इन्शुरन्स व इतर सर्व्हिस चार्ज लागले आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का असे विचारले. क्रेडिट कार्डविषयी त्या नाराज असल्याने त्यांनी मला क्रेडिट कार्ड बंद करायचे असल्याचे सांगितले. तेव्हा त्याने तुमच्या कार्डच्या मागे असलेल्या कस्टमर केअर नंबर वरुन तुम्हाला फोन येईल. त्यांना सांगून तुम्ही कार्ड बंद करु शकता, असे सांगितले. त्यानंतर काही वेळाने १८०० नंबरने सुरु होणार्‍या नंबरवरुन त्यांना एक फोन आला. त्याने त्यांची माहिती विचारुन घेतली. तुम्हाला कार्ड बंद करायचे असेल तर मागील तीन आकडी नंबर काढून घेतला. त्यानंतर त्यांच्याशी तो बोलत राहिला.

तुम्ही जो पत्ता दिला आहे, त्याच पत्त्यावर रहाता का. बँकेने पत्त्याचे व्हेरिफिकेशन केले का. बँकेचा माणूस तुमच्या घरी येईल, असे सांगत त्यांना बोलण्यात गुंतविले.
त्यातच त्यांना त्याने तुम्हाला ओटीपी आला असेल, तो सांगा, असे म्हणाला. बोलण्याच्या नादात त्यांनी त्याला ओटीपी सांगितला.
त्यानंतर काही मिनिटात त्यांच्या खात्यातून सायबर चोरट्यांनी १ लाख ९७ हजार ८२७ रुपये काढून घेऊन खाते रिकामे केले.
त्यांनी तातडीने याची तक्रार सायबर पोलिसांकडे केली. सायबर पोलिसांनी तातडीने पुढील पावले उचलून ही रक्कम ज्या बँकेत गेली,
त्यांच्याशी पत्रव्यवहार करुन ही रक्कम गोठविली आहे. पोलीस निरीक्षक शिवले तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Cyber ​​Crime | Cyber ​​thieves rob eye doctor for Rs 2 lakh; Fraud by claiming that a credit card carries a service charge pune cyber crime

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Yoga Asanas For Energy And Strength | दिवसाची सुरुवात ‘या’ योगासनांच्या सरावाने करा, राहील ताकद आणि चैतन्य

 

Pune Crime | हडपसर परिसरातील पादचार्‍यांना लुटण्याचा प्रयत्न करणार्‍या सराईत गुंडाची टोळी जेरबंद

 

Health Tips | आजारांना दूर ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत उपयुक्त 5 पदार्थ; रात्री भिजत घालून खाल्ल्याने होईल फायदा, जाणून घ्या