Pune Cyber Crime | सुशिक्षित पुण्यात सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट! एकाच दिवशी 11 फसवणुकीचे गुन्हे दाखल

कोथरुड, सिंहगड रोड, विश्रांतवाडी, चंदननगर, वानवडी, कोंढवा, हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीचं स्वरूप हे बदललं असून आता मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्ह्यांमध्ये (Pune Cyber Crime) वाढ होताना पाहायला मिळत आहे. सध्या ऑनलाईन व्यवहार सामन्य झाले असले तरी दुसरीकडे सायबर चोरट्यांकडून याचा गैरफायदा घेतला जात आहे. लोन अॅप (Loan App), टास्क फ्रॉड (Task Fraud), विज बील (Electricity Bill) भरण्याच्या बहाण्याने फसवणूक (Cheating Fraud Case), शेअर मार्केट (Share Market) अशा अनेक फसवणुकीच्या घटनांमध्ये पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मंगळवारी (दि.9) एकाच दिवशी शहराच्या विविध पोलीस ठाण्यात 11 गुन्ह्याची नोंद झाली आहे.(Pune Cyber Crime)

फसवणुकीच्या 11 घटना

 1. कोथरुड पोलीस स्टेशन (Kothrud Police Station) – MGNL गॅसचे बिल भरण्याच्या बहाण्याने 82 वर्षीय व्यक्तीची 7 लाख 67 हजार 620 रुपयांची फसवणूक
 2. कोथरुड पोलीस स्टेशन – युट्युबवरील व्हिडीओला लाईक करण्यास सांगून 40 वर्षाच्या महिलेची 2 लाख 90 हजारांची फसवणूक
 3. सिंहगड रोड पोलीस स्टेशन (Sinhagad Road Police Station) – विजबिल थकीत असल्याचे सांगून 59 वर्षीय व्यक्तीची 11 लाख 6 हजार 195 रुपयांची फसवणूक
 4. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन (Vishrantwadi Police Station) – शेअर मार्केटमधून नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने 54 वर्षीय महिलेची 15 लाख 13 हजार 051 रुपयांची फसवणूक
 5. चंदननगर पोलीस स्टेशन (Chandannagar Police Station) – पार्ट टाईम नोकरीच्या बहाण्याने 27 वर्षीय महिलेची 3 लाख 71 हजार 750 रुपयांची फसवणूक
 6. चंदननगर पोलीस स्टेशन – टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन करुन 44 वर्षीय महिलेची 27 लाख 88 हजार 323 रुपयांची फसवणूक
 7. वानवडी पोलीस स्टेशन (Wanwadi Police Station) – ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यानंतर जास्त परताव्याचे आमिष दाखवून 36 वर्षीय युवकाची 5 लाख 2 हजारांची फसवणूक
 8. कोंढवा पोलीस स्टेशन (Kondhwa Police Station) – टास्क देऊन 44 वर्षीय महिलेची 1 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक
 9. कोंढवा पोलीस स्टेशन – शेअर मार्केटमध्ये ट्रेडींग करण्यास सांगून 24 वर्षीय तरुणाची 2 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक
 10. कोंढवा पोलीस स्टेशन – शेअर मार्केटमध्ये ट्रेडींग करण्यास सांगून 36 वर्षीय युवकाची 2 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक
 11. हडपसर पोलीस स्टेशन (Hadapsar Police Station) – वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने 44 वर्षीय महिलेची 4 लाख 72 हजारांची फसवणूक

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Crime Branch | पिंपरी : कामगारांनीच चोरले कंपनीतील इम्पोर्टेड रबरी पार्ट, गुन्हे शाखेकडून आरोपी गजाआड; पावणे सात लाखांचा मुद्देमाल जप्त

Adani Group Entry In Pune | अदानी समुहाची पुण्यातील पिंपरीमध्ये मोठी गुंतवणूक, ‘या’ उद्योगासाठी फिनोलेक्सकडून २५ एकर जमीनीची खरेदी

Pimpri Cheating Fraud Case | पिंपरी : दुकाने व सदनिकांचा ताबा न देता सव्वा तीन कोटींची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल

Pune Lok Sabha Election 2024 | सोशल मीडिया आणि भेटीगाठींवर भर देत मुरलीधर मोहोळांचा जोरदार प्रचार, म्हणाले -”पुण्याला देशातील सर्वोत्कृष्ट…”