Pune Cyber Crime | प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचे फेसबुक अकाउंट हॅक; पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime | मुळशी पॅटर्न चित्रपटामुळे (Mulshi Pattern Film) घराघरात पोहचलेल्या प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांना सायबर चोरट्यामुळे मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. सायबर चोरट्याने (Cyber Thief) त्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट (Facebook Account) उघडून मित्रांना फोन केले. त्याशिवाय त्यांचे मुळ फेसबुक खाते हॅक (Hack) केले आहे. याप्रकरणी प्रवीण तरडे यांनी आज पुणे सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) जाऊन तक्रार दाखल केली आहे. (Pune Cyber Crime)
मराठी आणि हिंदी चित्रपटात आपल्या अनेक भूमिकांमुळे अभिनेता प्रवीण तरडे सोशल मीडियावरही सुप्रसिद्ध आहेत. त्यांचा लाखो फॉलोअर्स असून वेळोवेळी तरडे फेसबुकवर ऑनलाइन माध्यमातून प्रेक्षकांसोबत संवाद साधतात. सोशल मीडियात विशेष म्हणजे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ते तरूण- तरुणींसह नवोदित अभिनेत्यांना प्रोत्साहित करणारे मार्गदर्शन करणारे व्हिडिओ प्रसिद्ध करतात. मात्र, मागील काही दिवसांपूर्वी सायबर चोरट्याने त्यांच्या नावाचे मुळ फेसबुक खाते हॅक केले. त्यानंतर प्रवीण तरडे यांचे बनावट खाते उघडुन त्यांच्या मित्रांना मेसेज करीत फोनही केले असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी बनावट फेसबुक पेजची माहिती मिळताच तरडे यांनी पुणे सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. दरम्यान, सायबर विभागातील सहायक पोलिस निरीक्षक बलभीम ननवरे (Assistant Police Inspector Balbhim Nanvare) यांनी अभिनेते प्रवीण तरडे यांच्या नावाने बनावट फेसबुक खात्याच्या तक्रारीला दुजोरा दिला आहे. त्यानुसार तपास सुरू असल्याचे सांगितले. (Pune Cyber Crime)
Web Title :- Pune Cyber Crime | Famous director Praveen Tarde’s Facebook account hacked; Complaint lodged at Pune Cyber Police Station
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update