Pune Cyber Crime | वीज कनेक्शन कट होण्याची भिती दाखवून सायबर चोरट्यांनी घातला पावणे चार लाखांना गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime | महावितरणच्या (Mahavitaran) नावाने बिहारमधील सायबर चोरटे राज्यातील वीज ग्राहकांना वीज कापली जाण्याची रात्री अपरात्री धमकी देऊन त्यांच्या खात्यावर डल्ला मारु लागले आहेत. पुण्यातील एका नागरिकाला बिहारमधील (Bihar) सायबर चोरट्यांनी पावणेचार लाखांचा गंडा घातला. (Pune Cyber Crime)

 

याप्रकरणी धानोरी (Dhanori) येथील एका नागरिकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७७/२२) दिली आहे. त्यानुसार बिहारमधील मोतीहारी येथील बिजली विभागातील एस डी ओ व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २२ मे २०२२ रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला. (Pune Cyber Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरात असताना त्यांच्या मोबाईलवर फोन आला. “आपका पेमेंट अपडेड नही है, आपका इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आज रातको कट जायेगा, आप इलेक्ट्रिसिटी ऑफिसरसे बात करे,” असा मेसेज केला. फिर्यादीस क्वीक सपोर्ट अ‍ॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. फिर्यादीच्या एस बी आय बँकेच्या संयुक्त खात्यातून साडेतीन लाख रुपये व त्यांच्या आईच्या खात्यातून २५ हजार रुपये असा ३ लाख ७५ हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली. त्यांनी याची तातडीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्याचा तपास केला असता हा प्रकार बिहारमधील मोतीहारी विभागातून झाल्याचे निष्पन्न झाले. सायबर पोलिसांनी हा गुन्हा विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात वर्ग केला असून पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत.

 

याबाबत महावितरणने वेळोवेळी जाहीर केले आहे की,
महावितरण कधीही रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडीत करीत नाहीत कोणालाही फोन करुन तुमचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार असल्याचे सांगत नाही की कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगत नाही थकबाकी असेल तर संबंधितांना अगोदर नोटीस दिली जाते.
त्यांना थकबाकी भरण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला जातो, असे महावितरणने कळविले आहे.

 

 

Web Title :- Pune Cyber ​​Crime | Fearing power cut cyber thieves looted Rs 4 lakh

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा