Pune Cyber Crime | लोन क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी गुगलवर सर्च केला अन् खाते झाले क्लिअर; ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Cyber Crime | पुण्यात निवृत्त जीवन व्यतीत करणार्‍या ज्येष्ठ नागरिकाला डोबिवलीतील घराची विक्री करायची होती. त्यासाठी त्यांना बँकेचे लोन क्लिअरन्स सर्टिफिकेट हवे होते, त्यासाठी बँकेच्या नंबरसाठी त्यानी गुगलचा आधार घेतला. हा आधारच त्यांचा काळ ठरला अन त्यांचे बँक खाते क्लिअर झाले. चोरट्याने बँक खात्यातील ९ लाख ९९ हजार ३२४ रुपये काढून घेऊन फसवणूक केली. (Pune Cheating Fraud Case)

याबाबत वाकड येथे राहणार्‍या ६४ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २०५/२४) दिली आहे.(Pune Cyber ​​Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पूर्वी माझगाव डॉक येथे नोकरीला होते. तेथून निवृत्त झाल्यावर पुण्यात मुलाकडे रहायला आले. त्यांचे डोबिवलीत घर आहे. त्याची विक्री करायची होती. त्यासाठी त्यांना कॅनरा बँकेच्या डॉकयार्ड रोड शाखेचे लोन क्लिअरन्स सर्टिफिकेट पाहिजे होते. त्यांनी गुगलवर कॅनरा बँकेचा कस्टमर केअर नंबर सर्च केला. त्यावरील नंबरवर त्यांनी फोन केला. तेव्हा फोन घेणार्‍याने सिनिअरशी बोला असे सांगून दुसर्‍याकडे फोन दिला. त्याने थोड्या वेळाने व्हॉटसअ‍ॅप कॉल करतो, असे सांगितले. त्यानंतर त्याचा फोन आला. त्याने फिर्यादी यांना एक avval अ‍ॅप प्ले स्टोअरमधून डाऊन लोड करायला सांगितले. ते ओपन करुन त्याची स्क्रीन शेअर करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी ते अ‍ॅप डाऊनलोड करुन त्याची स्क्रीन शेअर केली. त्यानंतर त्यांनी जवळच्या एसबीआय एटीएममध्ये जाण्यास सांगून स्टेट बँक ऑफ इंडियाचे डेबिट कार्ड घेऊन ते गेले.

Pune Cyber ​​Crime

दोन वेळा एटीएम कार्ड टाकून ट्रान्झिक्शन करायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी पिन नंबर टाकून दोन ट्रान्झिक्शन केले. परंतु, एटीएममधून दोन स्लिप मिळाल्या. परंतु त्यांची कॅनरा बँकेची क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळाले नाही. तेव्हा त्यांनी पुन्हा कस्टमर केअरला फोन केला. तेव्हा त्याने गुगल पे अ‍ॅप ओपन करुन त्यावर युपीआय पीन नंबर टाकायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर त्यांच्या कॅनरा बँकेच्या खात्यातील ६९ हजार९८९ रुपये कट झाल्याचा मेसेज आला. त्यांनी थोडा वेळ वाट पाहिली तरी मोबाईलवर कोणतेही क्लिअरन्स सर्टिफिकेट न आल्याने त्यांनी पुन्हा त्याला फोन लावला. तेव्हा त्याने फोन कट केला. यानंतर त्यांच्या स्टेट बँकेतील खात्यातून प्रथम ५ लाख रुपये व नंतर ३ लाख ३२ हजार रुपये कट झाल्याचे मेसेज आले. तेव्हा त्यांना आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मारहाण करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चंदननगर परिसरातील घटना

Raj Thackeray-Manohar Joshi | मनोहर जोशींच्या निधनानंतर राज ठाकरेंचा शोकसंदेश, ”शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न…”

Maharashtra IAS Transfers | राज्यातील 12 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या ! कविता व्दिवेदी यांची पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त पदी नियुक्ती तर पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या संचालकपदी कार्तिकी एन एस यांची नियुक्ती

Pune Bibvewadi Crime | पुणे : सिनेस्टाईल पाठलाग करुन तरुणावर धारदार हत्याराने वार, दोन सराईत गुन्हेगारांवर FIR