Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांचा नवा फंडा ! ज्येष्ठ नागरिकाला घातला 5 लाखांना गंडा, जाणून घ्या
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime | सायबर चोरटे हे नेहमी नवनवीन फंडे काढून लोकांना फसवून गंडा घालत असतात. एका पद्धतीची लोकांना माहिती झाली की, ते दुसरा नवा प्रकार काढतात. लोकांचा विश्वास संपादन करुन त्यांचे बँक खाते रिकामे करतात. कोंढव्यातील (Kondhwa) एका ज्येष्ठ नागरिकाला बँक खाते ब्लॉक केल्याचा टेक्स मेसेज पाठवून लिंक पाठवून पॅनकार्ड टाईप करायला लावून तब्बल ५ लाखांना गंडा (Pune Cyber Crime) घातला आहे.
याप्रकरणी उंड्री (Undri) येथील एका ५७ वर्षाच्या गृहस्थाने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या मोबाइल फोनवर एसबीआय युझर अकाऊंट ब्लॉक केल्याचा टेक्स मेसेज पाठविला. त्यांना एक लिंक शेअर करुन त्यावर लॉगिन करुन नेट बॅकिंग अपडेट करुन तुमचा पॅन नंबर टाकण्यास सांगितले. त्यानुसार या नागरिकाने दिलेल्या लिंकवर जाऊन पॅनकार्ड क्रमांक टाईप केला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यावरुन ५ लाख ४ हजार ३४२ रुपये ट्रान्सफर करुन सायबर चोरट्यांनी फसवणूक (Pune Cyber Crime) केली. पोलीस निरीक्षक राऊत अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Cyber Crime | New Fund for Cyber Thieves! 5 lakhs to a senior citizen, know
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 96 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी
- Amravati Violence | त्रिपुरा हिंसाचाराचे पडसाद अमरावतीमध्ये, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- Pune Crime | बनावट दागिने दाखवून कारागिराने केली दीड कोटी रुपयांची फसवणूक; रविवार पेठेतील घटना