Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांचा नवा फंडा ! ट्रेडिंगमध्ये मोठा फायदा होत असल्याचे दाखवून व्यावसायिकाला सव्वा नऊ लाख रुपयांना गंडा

कशी केली फसवणूक वाचा सविस्तर, व्हा सायबर साक्षर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime | आंतरराष्ट्रीय कंपनीकडून (International Company) ट्रेडिंगमध्ये उलाढाल केली जात असून त्यात गुंतवणूक (Investment) केल्यास मोठा परतावा (Refund) मिळेल, असे भासवून सुरुवातीला परतावा मिळत असल्याचे दर्शवून विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर गुंतवणुकदार पैसे काढण्याची गोष्ट करु लागल्यावर त्याच्याकडे आणखी पैशांची मागणी केली जाते. त्याने तोपर्यंत केलेल्या गुंतवणूकीवर कोणता परतावा मिळत नाही. सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) अशा प्रकारे फसवणूकीचा (Fraud) नवा फंडा काढला आहे. त्यात पुण्यातील एक व्यावसायिक अडकला व 9 लाख 21 हजार रुपये गमावून बसल्याचे (Pune Cyber Crime) समोर आले आहे.

 

याप्रकरणी कात्रज (Katraj) येथे राहणार्‍या एका 47 वर्षाच्या व्यावसायिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एशिया अँड मलेशिया (Asia and Malaysia) व इंडिया फायनान्सचा संचालक (Director of India Finance) रिका लीमवर (Rika Lim) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार 14 एप्रिल 2022 पासून आतापर्यंत घडला आहे. (Pune Cyber Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना एक इंग्रजीमध्ये मेसेज आला होता. त्यात कोरोनामुळे तुमचा व्यवसाय बंद झाला असेल, बँकेचे व्यवहार वगैरे बंद असतील, असे मेसेज होता. त्यांनी त्याचा परिचय विचारल्यावर त्याने आपले नाव रिका लीम असून आपण फर एशिया अँड मलेशिया, केपेल कॉर्पोरेशन कंपनी, सिंगापूरमध्ये चीफ रिप्रेझेंटेटिव्ह (Chief Representative in Singapore) असल्याचे सांगितले. आमची कंपनी कंन्स्ट्रक्शन (Construction), वॉटर प्लांट (Water Plant) तसेच ट्रेडिंग व्यवसाय (Trading Business) आहे. ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवायचे़ त्या पैशांतून ऑनलाईन, डायमंड (Diamond), गोल्ड (Gold), प्लास्टिक (Plastic)अशा वस्तू खरेदी करायच्या व त्याचे पैसे वाढले की लगेच विकायच्या, असे पैसे तुम्ही गुंतवले तर खूप फायदा होतो, असे सांगितले.

त्यांनी फिर्यादी यांना रजिस्ट्रेशन साठी एक फॉर्म पाठविला. तो भरल्यानंतर त्यांना सुरुवातीला 50 हजार रुपये गुंतविण्यास सांगितले. त्यांना अगोदर दोन तीन जणांचे बँक खात्याचे नंबर दिल्यानंतर एका झारखंड (Jharkhand) येथील एका नंबरवर त्यांनी 18 एप्रिल रोजी पैसे पाठविले. रिका लीम यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ट्रेडिंगला सुरुवात केली. ट्रेडिंगमधून त्यांना दोन दिवसात 8 हजार रुपये फायदा झाल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी त्यांच्या ट्रेडिंग खात्यातून पैसे काढता येतील का अशी विचारणा केली. तेव्हा त्यांना होकार देण्यात आला. त्यानंतर त्यांनी 1 हजार रुपये काढून पाहिले. तेव्हा त्याचे चार्ज कट होऊन त्यांच्या खात्यात 950 रुपये जमा झाले. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. त्यांनी या ट्रेडिंगमध्ये आणखी साडेचार लाख रुपये गुंतविले.

 

रिका लीम याने दिलेल्या खात्यात ते पैसे पाठवून गुंतवणुक करत राहिले. त्यांनी एकूण 9 लाख 21 हजार 200 रुपये तीन खात्यात पाठवून पैसे गुंतविले. ते ट्रेडिंग करत राहिले. त्यांच्या 9 लाख 21 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख 70 हजार रुपये बॅलन्स दिसू लागला. त्यांना पैशाची गरज असल्याने त्यांनी रिका लीम यांच्याशी संपर्क साधला. त्याने तुम्ही एका दिवशी 1 लाख रुपये काढू शकता, असे सांगितले. त्यांनी 1 लाख रुपये काढण्यासाठी विनंती टाकली. परंतु, पैसे मिळाले नाही. त्यांनी पुन्हा रिका लीम यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी तुमच्या खात्यात आणखी 3 लाख रुपये टाका. त्यानंतर तुम्हाला सर्व पैसे काढता येतील असे सांगितले.

त्यांनी इंडिया फायनान्स डायरेक्टर नील याच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानेही अगोदर आणखी 3 लाख रुपये भरा असले सांगितले.
त्यांनी कंपनीच्या ईमेलवर संपर्क साधला. परंतु, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्याशी (Pune Cyber Police Station) संपर्क साधून तक्रार दिली होती.
पोलीस निरीक्षक यादव (Police Inspector Yadav) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Cyber ​​Crime | New Trick for Cyber ​​Thieves! cheating fraud case to the trader for Rs9.25 lacs

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rupali Chakankar | ‘मीच तुमच्याकडे तुमच्यावरच्या अश्लील Comment ची तक्रार करतो’; महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना पत्र

 

Maharashtra Crime News | धक्कादायक ! मुलानेच जन्मदात्या वडिलांवर कोयत्याने सपासप वार करून केला खून; परिसरात खळबळ

 

Gopichand Padalkar On Supriya Sule | ओबीसी आरक्षणावर गोपीचंद पडळकरांनी सुप्रिया सुळेंचा व्हिडीओ शेअर करत साधला निशाणा; म्हणाले – ‘एका अर्थी मला आनंद..’