Pune Cyber Crime News | टेलिग्राम ग्रुपवर ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने 16 लाखांची फसवणूक

पुणे : Pune Cyber Crime News | सायबर चोरटे (Cyberthieves) नेहमी वेगवेगळ्या युक्त्या काढून लोकांची फसवणूक (Cheating Case) करत असताना सध्या टेलिग्राम ग्रुपवर (Telegram Group) ऑनलाईन वर्कच्या (Online Work) नावाखाली टास्क पूर्ण (Complete Task ) करायला लावून त्यांच्याकडून पैसे पाठविण्यास लावून फसवणूक (Fraud Case) करण्याचा प्रकार जोरदार सुरु आहे. सोमवारी एका दिवसात १६ लाख १९ हजार ८६६ रुपयांची फसवणूक केल्याचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. (Pune Cyber Crime News)

अशी आहे टोळीची मोड ऑपरेंडी (Modus Operandi Of Cyberthieves Gang)

व्हिडिओ लिंकला लाईक करा, कमेंट करा, गुगलवर रिव्ह्यू द्या (Google Reviews) किंवा गुगलवर रेटिंग द्या असे वेगवेगळे टास्क सांगून ते पूर्ण केल्यास त्याचा मोबदलाही मिळेल असे सांगून टेलिग्राम ग्रूपवर जॉईन करून घेतले जाते. विश्वासात घेण्यासाठी टास्क पूर्ण केल्यावर त्याचा मोबदला अकाऊंट मध्ये पाठवला जातो. त्यानंतर सुरुवातीला ठराविक रक्कम भरावी लागेल, त्यावर तुम्हाला नफा सुद्धा मिळेल असे सांगून पैसे घेतले जातात. हळूहळू ही रक्कम वाढवली जाते. (Pune Cyber Crime News)

अशाप्रकारे वेगवेगळी कारणे सांगत पैसे उकळले जातात. फिर्यादीला त्यांच्या अकाऊंटवर पैसे जमा झालेले दिसतात.
पण ते काढता येत नाही. पैसे काढण्यासाठी आणखी एक टास्क पूर्ण करावा लागेल असे सांगून आणखी पैसे भरायला
भाग पाडले जाते. दुप्पट तिप्पट पैसे मिळणार म्हटल्यावर फिर्यादी पैसे भरत जातात. त्यांची मागणी कधी संपत नाही.
त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लोकांच्या लक्षात येते.

याबाबत शुक्रवार पेठेतील (Shukrawar Peth) एका ३० वर्षाच्या महिलेने खडक पोलीस स्टेशनमध्ये (Khadak Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३५/२३) दिली आहे. या महिलेला घरी बसून ऑनलाईन पद्धतीने टास्क पूर्ण करुन बेनिफिट मिळण्याचे आमिष दाखवून त्यांना ७ लाख ६३ हजार ८८८ रुपये भरायला भाग पाडले होते.

Advt.

वाघोली (Wagholi) येथील एका ४५ वर्षाच्या नागरिकाने लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये (Lonikand Police Station)
फिर्याद (गु. रजि. नं. ३४०/२३) दिली आहे. त्यानुसार रिया शुक्ला, प्रांजल सिंघल (रा. पंजाबी बाग, दिल्ली),
मानवी गोयल, अवंतिका गुलेरिया यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सायबर चोरट्यांनी टेलिग्राम ग्रुपवर ऑनलाईन वर्कच्या (Online Work On Telegram Group) नावाखाली
टास्क पूर्ण करायला लावून त्यांना वेगवेगळ्या खात्यावर ८ लाख ५५ हजार ९७८ रुपये पाठविण्यास भाग पाडून
फसवणूक केली. पोलीस निरीक्षक पाटील (Police Inspector Patil) तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Cyber ​​Crime News | 16 lakh fraud on the pretext of completing an online task on a Telegram group

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : दुर्देवी : शेततळयात बुडून बापलेकाचा मृत्यु, मदत मिळाल्याने आई वाचली

Deepak Kesarkar | विद्यापीठे व शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी एकत्रित काम करावे – पालकमंत्री दीपक केसरकर