पुण्यात सायबर चोरटयांचा धुमाकूळ, 3 महिलांना फसवलं

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात सायबर चोरट्यांचे फसवणुक सत्र कायम आहे. दररोज वेगवेगळ्या माध्यमातून सायबर चोरटे बँक खात्यातून पैसे पळवत आहेत. आज देखील तीन महिलांना या सायबर चोरट्यांनी फसवविले आहे. त्यांचे 3 लाख रुपये पळविले आहेत. सीमकार्ड व पेटीएम अ‍ॅप अद्यावयत करण्याच्या बतावणीने ही फसवणूक केली आहे.

वानवडी येथील महिलेची 1 लाख 19 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. त्यांना मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करीत सीमकार्ड अपग्रेड न केल्यास तुमची मोबाइल सेवा बंद पडेल, असे सांगितले. त्यानंतर महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवली. त्यानंतर बँक खात्यातून१ लाख १९ हजार रुपये ऑनलाईनरित्या काढून घेतले. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील तपास करत आहेत.

तर दुसऱ्या घटनेत औंध येथील महिलेला ८४ हजार ३१३ रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला काही दिवसांपूर्वी संदेश पाठविला होता. त्यामध्ये तुमच्या पेटीएम अ‍ॅपची मुदत संपत आली आहे. पेटीएम अपग्रेड न केल्यास बंद पडेल अशी बतावणी केली. त्यानुसार महिलेने संबंधित मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा सायबर चोरट्याने महिलेला क्विक सपोर्ट अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले. अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ८४ हजार ३१३ रुपये ऑनलाईनरित्या लांबविण्यात आले.

तसेच बँक अधिकारी असल्याची बतावणी करून सायबर चोरट्याने ज्येष्ठ महिलेच्या खात्याची माहिती घेउन ऑनलाईनरित्या ९५ हजार रुपये ट्रान्सफर केले आहेत. याप्रकरणी एका ७४ वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्याने महिलेच्या बँक खात्यातील माहिती अद्यावयत करण्याचे काम सुरू आहे. माहिती न दिल्यास बँकखाते बंद पडेल अशी बतावणी केली होती.

सायबर चोरटे नागरिकांकडून बँकखात्याची गोपनीय माहिती घेत आहेत. त्यामुळे ऑनलाईन फसवणूक केली जात आहेत. नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आमिष किंवा बतावणीचे फोन आल्यास सायबर पोलिस ठाण्यात तक्रार करावी.
-संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, सायबर विभाग

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like