Pune Cyber Crime News | ‘फास्ट’ घरपोच तिकीट मागविताना खात्यातून गेले ९० हजार FAST; सायबर चोरट्यांनी घातला गंडा

पुणे : Pune Cyber Crime News | रेल्वेचे तिकीट बुक (Train Tickets Booking) केल्यानंतर कुरीअरने पाठविलेले तिकीट लवकर मिळावे, यासाठी कुरीअर फास्ट मागविण्यासाठी जादा फि देताना सायबर (Pune Cyber Crime News) चोरट्यांनी ९० हजार रुपयांना गंडा (Cheating Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी बाणेर येथील एका ४८ वर्षाच्या नागरिकाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६००/२२) दिली आहे. (Pune Cyber Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना गुजरातला जायचे असल्याने फिर्यादी सागर गोळे यांच्या मार्फत गुजरात येथे रेल्वे तिकीट बुक केले होते. तिकीट न आल्याने फिर्यादीने सागर यांच्याकडे विचारणा केली.
त्यांनी मारुती कुरीअरने तिकीट पाठविले आहे असे सांगितले.
फिर्यादीचे पत्नीने गुगलवर मारुती कुरीअर सर्च करुन त्यावरील मोबाईलवर संपर्क साधला.
त्याने कुरीअर फास्ट पाहिजे असल्यास जादा फि द्यावी लागेल, असे सांगून फिर्यादीचे मोबाईलवर लिंक पाठविली.
ती लिंक उघडून त्यात माहिती भरल्यावर त्यांच्या खात्यातून ९० हजार रुपये ट्रान्सफर करुन फसवणूक
(Fraud Case) करण्यात आली. पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Cyber ​​Crime News | 90,000 went through account when ordering fast tickets FAST; Cyber ​​thieves have put a smile on their faces

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tunisha Sharma Suicide Case | तुनिषा आत्महत्या प्रकणात पोलीस तपासात झाला खुलासा; ‘आत्महत्यापूर्वी तुनिषा आणि शिझान यांच्यात झाले होते संभाषण’

Urmila Nimbalkar | मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरच्या हॉट फोटोजने वेधले सर्वांचेच लक्ष; फोटोज वायरल

Ajit Pawar | ‘बावनकुळेंच्या त्या वक्तव्यानंतर आमची तर झोपच हरपली’, अजित पवार यांचा मिश्कील टोला