Pune Cyber Crime News | माजी खासदार निलेश राणे यांना अपमानास्पद शिवीगाळ, बदनामी केल्याचा प्रकार; सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल


पुणे :
पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime News | माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांना ट्विटरवर अपमानास्पद शिवीगाळ करुन त्यांची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Cyber Crime News)

 

याबाबत योगेश अरुण शिंगटे (वय ३८, रा. डेक्कन) यांनी सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १/२३) दिली आहे. त्यानुसार राहुल मगर नावाच्या ट्विटर अकाऊंट चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ११ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२३ दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल मगर नावाच्या ट्विटर (Twitter) अकाऊंटवरुन माजी खासदार निलेश नारायण राणे (Former MP Nilesh Narayan Rane) यांच्या ट्विटर अकाऊंट वर “आर नाल्या तुला तुझ्या आई आणि बायको मधला फरक कळत नाही. तु काय लायकी आहे.
तुझ्या बापाला किती किंमत आहे, निल्या किती चालणार” असे ट्विट केले.

 

तसेच ठाणे येथील एका महिलेच्या ट्विटर अकाऊंटवर अश्लिल भाषा वापरुन ट्विट करुन
दोघांना अपमानास्पद शिवीगाळ करुन त्यांची बदनामी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक ननवरे तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Cyber Crime News | Former MP Nilesh Rane was defamed anddefamed; A case has been registered by the cyber police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा