Pune Cyber Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – Ather Energy ची डिलरशीप देण्याच्या नावाखाली 21 लाखाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime News | आय टी कंपनीत (Pune IT Companies) असलेल्या तरुणाने व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. परंतु, फारशी माहिती न घेता डिलरशीप मिळविण्यासाठी इंटरनेटवरुन केलेला प्रयत्न त्यांच्या चांगलाच अंगाशी आला. सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) इथर एनर्जीची डिलरशीप (Ather Energy Dealership) देण्याच्या नावाखाली तब्बल २१ लाख ३० हजार ५०० रुपयांचा गंडा (Cheating Case) घातला. (Pune Cyber Crime News)

याबाबत मगरपट्टा (Magarpatta City) येथे राहणार्‍या एका ४३ वर्षाच्या तरुणाने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६७१/२३) फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ ते २६ एप्रिल २०२३ दरम्यान घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आय टी कंपनीत काम करत होते. नोकरी ऐवजी स्वत:चा व्यवसाय चालू करावा, असा त्यांच्या विचार होता. त्यातून त्यांनी इंटरनेटवर काही ना काही तरी व्यवसायाची माहिती घेत होते. त्यांनी फेब्रुवारीमध्ये एथरएनर्जी च्या वेबसाईटवर डिलरशीपसाठी अर्ज भरला. त्यांना एका मोबाईल नंबरवरुन कॉल आला. तुम्ही डिलरशीपसाठी फॉर्म भरला होता. कंपनीने निवड केली असून तुम्हाला ई मेल करण्यात आला असल्याचे सांगितले. त्यांनी ई मेल पाहिल्यावर त्यावरील फॉर्ममध्ये त्यांनी सर्व माहिती भरुन पाठविला. (Pune Cyber Crime News)

 

त्यांना दुसर्‍या दिवशी डिलरशीपसाठी पेमेंटचे शेड्युल कसे असणार याची माहिती दिली होती. त्यात रजिस्टेशन फी, लायसन्स, सिक्युरिटी डिपॉझिट, स्टॉक, अ‍ॅग्रीमेंट असे सर्व मिळून ६२ लाख ७५ हजार ५०० रुपयांचे शेड्युल देण्यात आले होते. त्यानुसार, फिर्यादी यांनी त्यावर विश्वास ठेवून वेगवेगळ्या कारणासाठी पैसे पाठवत गेले. त्यावर दिलेल्या फोनवर संपर्क करुन पैसे पाठविल्याबाबत कळवत होते. कंपनीकडून त्यांना पेमेंट मिळाल्याची पावतीही पाठविली जात होती. अशा प्रकारे त्यांनी २६ एप्रिलपर्यंत एकूण २१ लाख ३० हजार ५०० रुपये पाठविले होते.

त्यानंतर त्यांनी विमाननगर (Viman Nagar) येथील एथर एनर्जी च्या स्कुटर शोरुमला भेट दिली.
त्यांच्याकडून कंपनीच्या लिगल सेल्स एक्सक्युटीव्हीचा मोबाईल घेतला. त्यांच्याशी संपर्क साधला.
फिर्यादी यांनी सांगितलेला ई मेल आयडी हा कंपनीचा अधिकृत ई मेल आयडी नसून तुमच्यासोबत काणी फसवणूक करीत असेल, खात्री करा,
असे सांगितले. तेव्हा त्यांनी कंपनीच्या वेबसाईट वर जाऊन माहिती घेतली
असता त्यांना आलेला ई मेल आयडी हा कंपनीचा नसून त्यांच्याशी बोलणारी व्यक्ती फसवणूक (Fraud Case) करीत आहेत.
तसेच त्यांनी पाठविलेले पैसे हे कंपनीचे अधिकृत बँक खाते नसल्याची माहिती मिळाली. त्यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक विश्वास डगळे (PI Vishwas Dagale) तपास करीत आहेत.


Web Title :- 
Pune Cyber ​​Crime News | Hadapsar Police Station – 21 lakh fraud in the name of
giving dealership of Ather Energy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mahavitran HR Director Arvind Bhadikar | महावितरणच्या मानव संसाधन संचालकपदी अरविंद भादीकर यांची निवड

Devarshi Narad Awards | देशविघातक शक्तींचा मुकाबला करण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची – राज्यपाल रमेश बैस

SARTHI Pune | ‘सारथी’च्या शैक्षणिक सवलती, सुविधांसंदर्भात लवकरच सर्वंकष समान धोरण ठरवणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Mahavitaran Director Yogesh Gadkari | महावितरणच्या संचालक (वाणिज्य) पदी योगेश गडकरी

Sudan Crisis | सुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील 34 नागरिक भारतात दाखल