Pune Cyber Crime News | अमेरिकेतील बहिण अडचणीत असल्याचे समजून त्याने पाठविले पैसे; सायबर चोरट्यांनी घातला दीड लाखांना गंडा

पुणे : Pune Cyber Crime News | अमेरिकेत असलेल्या बहिणीचा व्हॉटसअ‍ॅप (Whatsapp) मेसेज आला. आर्थिक अडचण असल्याचे सांगितले. त्याने प्रथम पैसे देण्यास नकार दिला. त्यावर ती नाराज झाली. बहिण आपली अडचण सांगू शकत नसेल, असे समजून त्याने पैसे पाठविले. प्रत्यक्षात सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) व्हॉटसअ‍ॅप डिस्प्लेवर बहिणीचा फोटो लावून प्रोफाईल तयार करुन भावाला दीड लाख रुपयांचा गंडा (Cheating Case) घातला असल्याचे निष्पन्न झाले. (Pune Cyber Crime News)

डेक्कन (Deccan Pune) परिसरात राहणार्‍या एका ४७ वर्षाच्या नागरिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७५/२३) दिली आहे. हा प्रकार २८ एप्रिल ते १ मे २०२३ दरम्यान ऑनलाइृन घडला आहे. (Pune Cyber Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक असून त्यांच्या बहिण लग्न होऊन ती अमेरिकेत राहते. बहिणीच्या व्हॉटसअ‍ॅप डिसप्ले प्रोफाईलवरुन फिर्यादी यांना एक मेसेज आला.
त्यात आपल्याला पैशांची गरज आहे, असे तिने म्हटले होते.
कशासाठी पैसे पाहिजेत, हे मात्र त्यात काही सांगितले नव्हते. फिर्यादी यांनी त्याला अगोदर काही उत्तर दिले नाही.
त्यांनी कारण विचारून इतके पैसे पाठविण्याची त्यांनी असमर्थता दाखविली.
तेव्हा तिने पैसे पाठविता येत नसेल तर नको पाठवू, असा मेसेज केला.
तेव्हा आपली बहिण नाराजी झाली असे त्यांना वाटले. बहिणीला खरोखरच अडचण असेल, कारण ती सांगू शकत नसेल,
असे वाटल्याने शेवटी त्यांनी गुगल पेद्वारे मेसेज आलेल्या नंबरवर दीड लाख रुपये पाठविले.
त्यानंतर आता त्यांनी बहिणीशी संपर्क साधला असता, त्यांनी आपण कधी पैसे मागितलेच नाही.
हा नंबरही आपला नसल्याचे सांगितले. तेव्हा आपली फसवणूक (Fraud Case) झाल्याचे लक्षात आल्यावर
त्यांनी फिर्याद दिली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार (Sr PI Sandipan Pawar) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Cyber ​​Crime News | He sent the money thinking that his sister in America was in trouble; One and a half lakhs stolen by cyber thieves

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mahavitaran News | प्रतिसाद वाढल्याने छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांना आणखी वेग द्या – मुख्य अभियंता राजेंद्र पवार

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात रोखला दुसरा बालविवाह