सायबर भामट्यांनी ज्येष्ठ महिलेकडून 2 लाख उकळले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेला 2 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. 18 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली आहे. याप्रकरणी मंगला प्रधान (वय 63, रा. एरंडवणे) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगला प्रधान सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाल्या आहेत. 18 फेब्रुवारी रोजी त्या घरी असताना त्यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. तसेच, बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याची बतावणी केली. त्यानंतर क्रेडीट कार्डची वैधता वाढविण्याचे सांगत गोपनीय माहिती विचारुन घेतली. तसेच, ऑनलाइनरित्या त्यांच्या खात्यावरून 2 लाख 10 हजार रुपये स्वतःच्या खात्यात वर्ग करुन घेतले.

बँक खात्यातून रक्कम कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर मंगला यांनी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला होता. त्यानुसार त्याची चौकशीकरून सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश तटकरे अधिक तपास करीत आहेत.