पुण्यातील ज्येष्ठ महिलेला सायबर भामट्यांचा 65 हजारांचा गंडा

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – चेंबूरमधील बजाज फायनान्सच्या कंपनीतून बोलत असल्याचे सांगत सायबर चोरट्याने महिलेला 65 हजारांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 65 वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार 19 फेबु्रवारी रोजी घटना आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शासकीय सेवेतून निवृत्त झाल्या आहेत. 19 फेबु्रवारी रोजी त्यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने आपण बजाज फायनान्स चेंबूर येथील कंपनीतून रोहन शर्मा बोलत असल्याचे सांगितले. तसेच, जेष्ठ महिलेचा विश्वास संपादित केला. तर, त्यांना एक अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले. अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यांच्या फोन पे ची माहिती घेतली. त्यानंत त्यांना 12 रूपये पाठविण्यास सांगितले. फिर्यादींनी 12 रुपये पाठविल्यानंतर त्यांच्या बँकखात्यातून 65 हजारांची रक्कम स्वतःच्या बँकखात्यात वळवून घेऊन त्यांची फसवणूक केली. प्रकार लक्षात आल्यानंतर जेष्ठ महिलेने येरवडा पोलिसांत तक्रार दिली. प्राथमिक चौकशीनंतर त्यांने गुन्हा दाखल केला. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक यूनूस शेख हे करत आहेत.