पुणेकरांनो सावधान : सायबर भामट्यांची सीम कार्ड स्वॉपिंगची नवी शक्कल

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुणेकरांनो सावधान…कारण, सायबर चोरट्यांनी आता “सीम कार्ड स्वॅपिंग”ची नवी शक्कल लढवून खात्यातील पैशांवर डल्ला मारत आहेत. त्याद्वारे सीमचा क्रमांक घेऊन ते ऑनलाईनरित्या रक्कम हडप करतात. त्यामुळे कोणीही सीमकार्डची माहिती न देण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

दिवसेंदिवस सायबर चोरीच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दरवेळी सायबर चोरटे नवीन पद्धतीने फसवणूक करत आहेत. आता सायबर चोरट्यांनी सीम स्वॅपिंगची पद्धत अवलंबली आहे. त्याद्वारे आतापर्यंत पाच जणांना गंडा घालण्यात आला आहे. चोरट्यांकडून टेलिफोन कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करुन सीमकार्डची माहिती घेतली जात आहे. त्यानंतर ऑनलाईनरित्या बँकपासवर्ड डिटेल्स कॉपी करुन नागरिकांचे पैसे स्वतःखात्यात वर्ग केले जात आहे. त्यामुळे कोणीही फोन करुन सीमकार्डची माहिती विचारत असल्यास त्यांना उत्तरे देउ नका. त्यासंदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सीम कार्ड स्वॅप करुन नागरिकांची फसवणूक करणारी सायबर टोळी सक्रिय आहे. नागरिकांनी सीमसंदर्भात कोणतीही गोपनीय माहिती अनोखळी व्यक्तीला देऊ नये. त्याशिवाय फोन करणाऱ्यांची माहिती तत्काळ सायबर पोलिसांना द्यावी असे सायबर व आर्थिक गुन्हे विभागाचे उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले आहे.

बनावट सीमकार्डद्वारे सायबर चोरट्यांकडून नागरिकांना फोन केला जातो. त्यानंतर टेलिफोन वंâपनीतून बोलत असल्याची बतावणी करुन कॉल ड्रॉप, इंटरनेट सव्र्हिस सेवा संदर्भात माहिती विचारुन घेतली जाते. त्यानंतर सीमकार्डचा नंबर घेउन एक क्रमांक दाबायला सांगितले जाते. त्यानंतर सीम स्वॅप होते. अशारितीने ऑनलाईन फसवणूक केली जाते.