Pune Cyber Crime News | गुगलवरील आयआरसीटीसी वेबसाईटने दिला धोका; सायबर चोरट्यांनी घातला साडेतीन लाखांना गंडा

पुणे : Pune Cyber Crime News | रेल्वेचे तिकीट (Railway Ticket) कॅन्सल करण्यासाठी त्यांनी गुगलवर सर्च केले. तेथे असलेल्या सायबर चोरट्यांच्या आरआरसीटीसी वेबसाईट (IRCTC Website) त्यांनी उघडली. तिकीट कॅन्सल होण्याऐवजी त्यांच्या खात्यातून साडेतीन लाख रुपयांवर सायबर चोरट्यांनी डल्ला मारला. (Pune Cyber Crime News)

याबाबत औंधमधील एका ६९ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १९८/२३) दिली आहे. हा प्रकार २३ जानेवारी २०२३ रोजी घडला. (Pune Cyber Crime News)

याबाबतची माहिती अशी, फिर्यादी यांनी रेल्वेचे तिकीट आयआरसीटीसीवरुन बुक केले होते. परंतु, त्यानंतर त्यांचा प्रवासाचा बेत रद्द झाला. त्यामुळे त्यांनी रेल्वेचे तिकीट कॅन्सल करण्यासाठी मोबाईलवरुन गुगलवर सर्च केला. तेव्हा त्यांना आयआरसीटीसीच्या अनेक साईट आढळून आल्या. त्यापैकी एक साईट त्यांनी उघडली. ती नेमकी सायबर चोरट्यांची होती. त्यांनी साईट उघडताच त्यांना सायबर चोरट्यांचा फोन आला. त्यांची चौकशी त्यांच्याकडून पीएनआयआर नंबर घेतला. त्यांच्या तिकीटांची माहिती सांगितली. त्यानंतर त्यांनी तिकीट कॅन्सल करायचे असल्याचे सांगितल्यावर त्यांना एक लिंक पाठवून ती भरुन पाठवा, असे सांगितले.

त्यानुसार त्यांनी फॉर्म भरुन पाठविला. तेव्हा त्यांना तुमचे पैसे खात्यात जमा झाले आहेत, तपासून पहा,
असे सांगितले. तेव्हा त्यांनी बँक खाते उघडून पाहिले तर खात्यात पैसे जमा झाले नव्हते.
तेव्हा सायबर चोरट्याने त्यांना नेट स्लो असल्याने कदाचित काही वेळात पैसे जमा होतील, असे सांगितले.
तेवढ्यात त्यांना स्टेट बँकेतून फोन आला, तुम्ही १ लाख रुपयांचे व्यवहार केले आहेत का अशी चौकशी केली.
त्यांनी नाही असे सांगितले. तेव्हा बँक कर्मचार्‍याने हा सायबर फ्रॉड असून तुमचे इंटरनेट बँकिंग बंद करतो.
तुम्ही बँकेत तक्रार करा. तोपर्यंत सायबर चोरट्यांनी त्यांच्या ३ खात्यातून ३ लाख ४४ हजार रुपये काढून
घेऊन फसवणूक केली होती. पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Cyber Crime News | The risk by the IRCTC website on Google; Cyber thieves wore three and a half lakhs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | मित्राच्या मदतीने शारीरीक संबंधाचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची दिली धमकी

Yavatmal Crime News | पाणी काढायला सांगून पत्नीला विहिरीत ढकलून केला खून

Beed Crime News | दहावीची परीक्षा देऊन घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीसोबत घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

Pune Crime News | भाडेकरुने बनावट दस्त तयार करुन फ्लॅट बळकाविण्याचा केला प्रयत्न; वकीलासह तिघांवर गुन्हा दाखल