Pune Cyber Crime | 9 महिन्यांच्या सखोल तपासानंतर कोट्यावधीच्या क्रिप्टो करन्सीच्या फसवणूकीचा पर्दाफाश, जाणून घ्या ‘बिटकॉईन’च्या चोरीचं गुढ कसं उकललं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime | फसवणूक प्रकरणातील आरोपी अमित भारद्वाज (Amit Bhardwaj) व विवेककुमार भारद्वाज (Vivek Kumar Bhardwaj) या दोघा भावांनी पुण्यासह देशभरातील सुमारे साडेचारशे लोकांची बिटकॉईनमध्ये (Bitcoin) फसवणूक (Cheating) केली होती. जगभर गाजलेल्या या प्रकरणात पहिला गुन्हा दत्तवाडी (Dattawadi Police Station) व निगडीमध्ये (Nigdi Police Station) दाखल झाला होता. पुणे पोलिसांनी (Pune Police) त्यात दोघांना अटक केल्यानंतर देशभरात त्यांच्याविरुद्ध अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात एकूण १७ जणांना अटक केली होती. बिटकॉईनबाबत (Cryptocurrency) फारशी माहिती नसल्याने पोलिसांनी सायबर तज्ञ (Cyber Expert) पंकज प्रकाश घोडे (Pankaj Prakash Ghode) व तत्कालीन आयपीएस अधिकारी (Ex – IPS Officer) रविंद्रनाथ प्रभाकर पाटील (Ravindranath Prabhakar Patil) यांची मदत घेतली. पण, पोलिसांनी विश्वासाने दिलेल्या तांत्रिक माहितीचा दुरोपयोग (Missuse) करुन या मार्गदर्शकांनीच पोलिसांची फसवणूक (Fraud Case) तर केलीच पण, आता पोलिसांनी नेमका कोणावर विश्वास ठेवावा, अशी परिस्थिती निर्माण केली आहे. (Pune Cyber Crime)

 

पंकज घोडे आणि रवींद्र पाटील यांनी क्रिप्टो करन्सी जप्त करताना बजावलेली भूमिका राज्याच्या आर्थिक गुन्हे विभागाचे अपर पोलीस महासंचालक (ADGP, EoW Maharashtra) यांना संशयास्पद वाटली. त्यांनी प्रकरणाच्या आणि या दोघांच्या चौकशीचे आदेश दिले. आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या (EoW And Cyber Crime DCP) पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navtake) यांच्यामार्फत ही चौकशी (Police Enquiry) सुरु झाली. त्यासाठी एका खासगी कंपनीची मदत घेण्यात आली.

 

पंकज घोडे व रवींद्र पाटील यांना आरोपीकडून जप्त तांत्रिक डाटा (Technical Data) विश्वासाने सोपविला होता.
त्यामुळे तपासादरम्यान या दोघांनी उच्च दर्जाची व्यावसायिक नैतिकता व सचोटी दाखविणे अभिप्रेत होते.
परंतु, पोलिसांना यातील काही समजत नाही. ते आपल्यावरच अवलंबून आहे,
असे समजून या दोघांनी त्याचा गैरफायदा मिळविण्याचा प्रयत्न केला. (Pune Cyber Crime)

याचा तपास सुरु केल्यावर त्यांनी आरोपींच्या क्रिप्टो करन्सी खात्यातून झालेल्या व्यवहाराची संपूर्ण ब्लॉकचेन (Blockchain) पोलिसांच्या या पथकाने अथक प्रयत्न करुन त्याची संगती लावली.
त्यांच्या Know Your Customer (KYC) वरुन या दोघांनी हे बिटकॉईन कसे कसे कोणत्या अकाऊंटवर ट्रान्सफर करुन ते वेगवेगळ्या ठिकाणी कसे फिरविले, याची लिंक पोलिसांनी शोधून काढली.
त्यासाठी पथक गेली ९ महिने हे काम चिकाटीने करत होते. त्यातून या दोघांनी आरोपीचे क्रिप्टो करन्सी त्यांचे स्वत:चे व अन्य खात्यावर वळवून घेतल्याचे स्पष्ट झाले. (Pune Crime)

 

तपास अधिकार्‍यांनी जप्त केलेल्या आरोपीचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रिप्टो एक्सचेंजच्या वॉलेटमधून क्रिप्टो करन्सी, स्वत:चे, तसेच त्यांचे अन्य साथीदारांचे विविध क्रिप्टो करन्सी वॉलेटमध्ये परस्पर वळवून घेतले.
रवींद्र पाटील याने अशा प्रकारे तब्बल ४५ बिटकॉईन स्वत:च्या व इतर नातेवाईकांच्या नावावर वळविले आहेत.
(सध्या एका बिटकॉईनची किंमत ३२ लाख रुपयांच्या जवळपास आहे. हे पाहता एकट्या रवींद्र पाटील याने १४ कोटी ४० लाख रुपयांचे बिटकॉईन हडपले आहेत.) दोघांनी मिळून जवळपास २० कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पंकज घोडे हा सुरुवातीपासून या गुन्ह्याचा तपासात मदत करण्याचा बहाणा करीत होता.
त्याने तपास अधिकार्‍यांना या आरोपींचे वॉलेटच्या ब्लॉक चेनचे स्क्रीनशॉट्स चे बनावटीकरण केले. बनावट स्क्रीन शॉट तयार करुन तेच खरे असल्याचे भासविले.
त्यांच्या वॉलेटमध्ये कमी बिटकॉईन असल्याचे दाखविले. प्रत्यक्षात आरोपींच्या खात्यात अधिक बिटकॉईन होते.
आरोपीच्या वॉलेटमधील क्रिप्टो करन्सीमधील पूर्ण बिटकॉइृन जप्त न करता काही भाग तसाच ठेवून पोलिसांची फसवणूक केली.
त्यानंतर हे बिटकॉईन इतर खात्यात वळविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

राज्यातील अनेक पोलीस अधिकारी बिटकॉईन तसेच सायबर क्राईमच्या तपासासाठी पंकज घोडे आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील (Ex – IPS Officer Ravindranath Prabhakar Patil) यांचा सल्ला घेत आले आहेत.
पोलिसांनी विश्वासाने त्यांची मदत घेतली होती. आता त्यांनीच असा केसाने गळा कापला असल्याचे उघड झाले आहे.
त्यामुळे सायबर क्राईममध्ये दररोज नव्या नव्या प्रकारच्या गुन्ह्यांची भर पडत आहे.
अशा वेळी तज्ञांची मदत तरी कशी घ्यायची असा प्रश्न आता सर्वच पोलीस अधिकार्‍यांसमोर उपस्थित होणार आहे.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve),
अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), सायबर उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navtake),
सहाय्यक आयुक्त विजयकुमार पळसुले (ACP Vijaykumar Palsule),
व. पो. नि. डी. एस. हाके (Senior Police Inspector D. S. Hake)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण (Police Inspector Ankush Chintaman) ,
पो. नि. मिनल सुपे – पाटील (Police Inspector Minal Supe Patil),
सायबर पोलिस ठाण्यातील राजुरकर, खेडकर, कोळी, भोसले, भापकर, नलावडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक वाळके,
उपनिरीक्षक नेमाणे, डफळ, पडवळ आणि 27 पोलिस अंमलदार तसेच न्याय वैज्ञानिक प्रयोग शाळेतील अधिकारी तज्ञ तेजस कट्टे,
तनुजा सुर्यराव, राहूल कनोज व श्रीमती गायकवाड यांनी गेल्या 9 महिन्यांपासून अथक परिश्रम करत सखोल तपास करून ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे.

 

Web Title :- Pune Cyber ​​Crime | Pankaj Prakash Ghode & Ex IPS Officer Ravindranath Prabhakar Patil Arrested After 9 months of thorough investigation crores of cryptocurrency fraud exposed find out how the mystery of Bitcoin theft was solved

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


 

 

 

IPS Amitabh Gupta, IPS Dr. Ravindra Shisve, IPS Ramnath Pokale, IPS Bhagyashree Navtake, Pune Criminals, Pune News