Pune Cyber Crime | मुलाची चूक पोलीस हवालदाराला पडली महागात, सायबर चोरट्यांचा बँक खात्यावर डल्ला
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime | वडिलांच्या मोबाईलवर गेम (Mobile Game) खेळण्यात मग्न असलेल्या पोलीस हवालदाराच्या (Police Constable) 9 वर्षाच्या मुलाने अज्ञात कॉलच्या (Unknown Call) सूचनांचे पालन केले. यामुळे पोलीस हवालदाराच्या बँक खात्यातून सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) ऑनलाइन 25 हजार रुपये काढून (Pune Cyber Crime) घेतले. बँक खात्यातून पैसे डेबिट (Debit Money) झाल्याचा मेसेज आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर पोलीस हवालदाराने सायबर क्राइम सेलकडे (Cyber Crime Cell) तक्रार अर्ज केला आहे.
चिखली पोलिसांनी (Chikhali Police) दिलेल्या माहितीनुसार, 14 फेब्रुवारी रोजी पोलीस हवालदार हे घरी होते. त्यावेळी त्यांच्या 9 वर्षाच्या मुलाने गेम खेळण्यासाठी त्यांचा फोन घेतला. त्यावेळी अज्ञात व्यक्तीचा फोन आला. मुलाने फोन करणाऱ्या व्यक्तीला उत्तर दिले. कॉल करणाऱ्या व्यक्तीने पॅन कार्ड अपडेट (AN Card Update) करायचे असल्याचे सांगितले. तसेच पॅन कार्ड अपडेट केले नाही तर ते रद्द होईल असे सांगितले. (Pune Cyber Crime)
यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीने मुलाला पाठवलेली लिंक उघडण्यास सांगितले व बँक खात्याचे तपशील (Account Details) भरण्यास सांगितले.
यानंतर आलेला ओटीपी (OTP) विचारून घेतला. मुलाने ओटीपी सांगितल्यानंतर पोलीस हवालदाराच्या बँक खात्यातून 25 हजार रुपये डेबिट झाले.
याबाबत चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) फसवणूक (Cheating) आणि माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यानुसार (IT Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
Web Title :- Pune Cyber Crime | police havaldar’s boy made a big mistake someone cheated by 25000 the
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
BJP Vikram Pawaskar | भाजपा प्रदेश सचिवपदी विक्रम पावसकर यांची नियुक्ती
Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांसाठी विधानसभेत केली ‘ही’ मोठी घोषणा