Pune Cyber Crime | मेसेजला प्रतिसाद देणे पडले महागात; प्राध्यापकाला सायबर चोरट्याने घातला 5 लाखांना गंडा

पुणे : Pune Cyber Crime | बँका तसेच पोलीस सायबर क्राईमपासून सावध राहण्याच्या वारंवार करीत असतात. अनोळखी मोबाईलवरुन आलेल्या मेसेजला उत्तर देऊ नका असे सांगत असताना एका प्राध्यापकाने तुमचे सीमकार्ड २३ तासात ब्लॉक होईल, असा मेसेजला प्रतिसाद देऊन त्यातील नंबरवर संपर्क केला आणि ४ लाख ९० हजार रुपये गमावून बसले. (Pune Cyber Crime)

याप्रकरणी सदाशिव पेठेत (Sadashiv Peth, Pune) राहणार्‍या एका ५३ वर्षाच्या प्राध्यापकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं.२१८/२२) दिली आहे.
फिर्यादी हे एका महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता.
तुमचे जिओचे सीमकार्ड २४ तासात ब्लॉक होईल व सीम कार्ड व्हेरीफिकेशन बाकी आहे त्यासाठी संपर्कासाठी नंबर देण्यात आला होता.
त्यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधला.
तेव्हा त्यांना तुम्ही जिओ अ‍ॅप उघडून १० रुपयांचे रिचार्ज हे नेटबँकिंगने करा आणि फोन व्होल्डवर ठेवा,
असे सांगितले. त्याप्रमाणे प्राध्यापकाने त्यावर विश्वास ठेवून १० रुपयांचे रिचार्ज केले व फोन बंद न करता होल्डवर ठेवला. फोन होल्डवर ठेवल्यानंतर त्यांनी बँकेचे लॉगीन केले आणि बँक बॅलेन्स चेक केला.
तेव्हा त्यांच्या खात्यात पूर्ण रक्कम होती. त्यामुळे ते फोनवर या व्यक्तीशी बोलत होते.
त्यानंतर त्यांना ओटीपी (OTP) आला. आणि त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामधून ४ लाख ९० हजार
रुपये कमी झाले. त्यानंतर त्यांनी मोबाईलवरील बोलणे बंद केले. विश्रामबाग पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Pune Cyber Crime)

Web Title :- Pune Cyber ​​Crime | Responding to messages is expensive; 5 Lakhs was extorted from a professor by a cyber thief

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tunisha Sharma Death | तुनिषा मृत्यू प्रकरणी मैत्रीण राया लबीबने केले ‘हे’ मोठे विधान

Pune Crime | न्यायालयाने दखल घेतल्यानंतर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल; प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन तरुणाचा खून