Pune Cyber Crime | पैसे दुप्पट होण्याचे आमिष ८१ वर्षाच्या ज्येष्ठाला पडले महागात; सायबर चोरट्यांनी केली १२ लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime | चांगल्या कंपनीत गुंतवणुक (Investment) केल्यास पैसे डबल करुन देतो, असे आमिष दाखवून वेगवेगळ्या बँकांमध्ये रक्कमा भरायला सांगून एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ११ लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Cyber Crime)

 

याप्रकरणी सहकारनगरमध्ये राहणार्‍या एका ८१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७/२३) दिली आहे. हा प्रकार जानेवारी २०१७ ते मार्च २०२२ दरम्यान घडला. (Pune Cyber Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना वेगवेगळ्या मोबाईलवरुन दीपक मारवाड,
राहुल जान अशी नावे सांगून फोन करण्यात आले. त्यांना चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणुक केल्यास पैसे डबल करुन देतो,
असे सांगितले. त्यांच्या या आमिषाला फिर्यादी यांनी प्रतिसाद दिला.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या बँक खात्यावर त्यांनी पेसे भरले.
त्यानंतर पाच वर्ष झाल्यानंतरही पैसे परत न मिळाल्याने त्यांना आपली फसवणूक (Cheating Case) झाल्याचे लक्षात आले.
त्यानंतर आता त्यांनी फिर्यादी दिली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळगावकर तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Cyber Crime | The 81-year-old man was lured to double his money; 12 lakh fraud done by cyber thieves

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘माझी महिलांना विनंती आहे, जास्त पलटण वाढवू नका’, अजित पवारांचा सल्ला अन् एकच हश्शा

Nepal Plane Crash | नेपाळमध्ये यती एअरलाइन्सचे विमान कोसळलं, 32 जणांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून शारीरीक संबंधाचे फोटो नातेवाईकांमध्ये केले व्हायरल