Pune Cyber Crime | ऑनलाईन पत्ता बदलण्याचा प्रयत्न ! सायबर चोरट्यांकडून बाणेरमधील महिलेची सव्वा सात लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime | आता सर्व घरबसल्या ऑनलाईन करा असे सांगितले जाते. पण, त्याविषयी अपूर्ण ज्ञान असले की सायबर चोरटे त्याचा गैरफायदा घेतात आणि त्याचा नागरिकांना फटका बसतो (Online Fraud). बँक खात्याचा (Bank Account) ऑनलाईन पत्ता बदलता येईल, असे सांगून सायबर चोरट्याने महिलेला तब्बल ७ लाख २२ हजार रुपयांना गंडा (Cheating Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे यात ओडिशाचा सायबर चोरटा (Cyber Criminals) असून वापी येथील एका बँक खात्यात ते पैसे ट्रान्सफर झाल्याचे आढळून आले आहे. (Pune Cyber Crime)
याप्रकरणी बाणेर (Baner) येथे राहणार्या एका ४० वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २५३/२२) दिली आहे. त्यानुसार रमाकांत दिलीप मोरे (रा. वलसाड, वापी, गुजरात) आणि नितीश जेना (रा. अनंतरपूर, भद्रक, ओडिशा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Cyber Crime)
—
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या गृहिणी आहेत. त्यांना १५ जानेवारी रोजी फोन आला. त्याने आपण आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे खाते असून तुमचा पत्ता बदल करायचा आहे का असे विचारले. त्यावर त्यांनी हो म्हटल्याने त्याने तुम्ही ऑनलाईन पत्ता बदलू शकता, असे सांगून एनी डेस्क अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी ते १७ जानेवारीला डाऊनलोड केले. त्यानंतर त्यांना पुन्हा फोन आला. त्याने हे अॅप बँकेशी लिंक असलेला जुना पत्ता व पाहिजे असलेला नवीन पत्ता भरून तसेच फॉर्ममध्ये असलेली इतर माहिती भरली. त्यानंतर त्यांना एक ओटीपी आला. सायबर चोरट्यांनी त्यांना ओटीपी विचारला. त्यांनी तो सांगितला आणि फसल्या.
OTP सांगितल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातील ७ लाख २२ हजार ५०२ रुपये ट्रान्सफर झाले त्यांना ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
त्यांनी तातडीने सायबर पोलिसांकडे तक्रार केली.
सायबर पोलिसांनी हे पैसे वापीमधील रमाकांत मोरे यांच्या खात्यात जमा झाल्याचे सांगून ते गोठविल्याचे फिर्यादी यांना सांगितले.
फिर्यादी यांना ज्या मोबाईलवरुन फोन आला होता.
तो ओडिशातील नितीश जेना याचा असल्याचा सायबर पोलिसांच्या (Pune Cyber Police) तपासात आढळून आले आहे.
Web Title :- Pune Cyber Crime | Trying to change address of bank account via online Cyber thieves defraud woman of Rs 7 lacs
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update