पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्मार्ट पुणेकरांना सायबर चोरटे दररोज वेगवेगळ्या बहाण्याने गंडा घालत असून, दिवसेंदिवस अशी प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत चालली असल्याचे पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये सायबर चोरट्यांनी पावणे दोन लाख रुपये उकळले आहेत. चंदननगर आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चंदननगर पोलीस ठाण्यात उमर कासिम चिक्काळी (वय 26) यांनी फिर्याद दिली आहे. उमर कासिम कोठारी व्हिल्समध्ये कामाला आहे. 14 जानेवारीला कामावर असताना त्यांना सायबर चोरट्याने फोन करुन बँकेतून बोलत असल्याची बतावणी केली. तुमचे क्रेडीट कार्ड बंद होणार असल्याची बतावणी करुन सायबर चोरट्याने उमर कासिम यांच्याकडून बँक खात्याची गोपनीय माहिती विचारुन 20 हजारांचा ऑनलाइन गंडा घातला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर अधिक तपास करीत आहेत.
दुसर्या घटनेत ओएलएक्सवरून फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी माधव महाबळेश्वरकर (वय 50, रा. वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधव यांना दुचाकी खरेदी करायची होती. त्यासाठी त्यांनी ऑनलाईनरित्या ओएलएक्स वेबसाईटवर दुचाकीची जाहिरात पाहून संबंधिताला फोन केला. त्यानुसार कमी किंमतीत दुचाकी विक्रीच्या बहाण्याने सायबर चोरट्याने माधव यांच्याशी ओळख वाढवून विश्वास संपादित केला. सायबर चोरट्याने माधव यांच्याकडून गाडी विक्रीच्या बहाण्याने वेळोवेळी विविध बँक खात्यात 1 लाख 48 हजार रुपये जमा करुन घेतले. रक्कम जमा करुनही दुचाकी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे माधव यांच्या लक्षात आले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील ताकवले अधिक तपास करीत आहेत.
- थंडीच्या दिवसात प्या ‘आल्याचे पाणी’, होतील ‘हे’ 4 फायदे !
- ‘कापूर’ वाढवेल तुमचे आरोग्य आणि सौंदर्य ! जाणून घ्या 5 फायदे
- बटाट्याची साठवण करताना ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा
- सावधान ! ‘च्युइंगम’ चुकून गिळल्यास होऊ शकतात ‘या’ 4 गंभीर समस्या
- ‘या’ 3 पद्धतीने हात धुवा स्वच्छ, अनेक गंभीर आजारांपासून होईल बचाव
- प्रमाणापेक्षा जास्त घाम का येतो ? जाणून घ्या 3 कारणे आणि 3 उपाय !