Pune Cyber Police News | मोबाईल कॉलद्वारे ऑनलाईन 66 लाखांची फसवणूक, पुणे सायबर पोलिसांकडून बिहार येथून आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Police News | एका नामांकित कंपनीच्या कार्यालयात अकाउंट विभागात काम करणाऱ्या एका व्यक्तीला मोबाईलवर फोन करुन सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) 66 लाखांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police News) फसवणूक करणाऱ्या टोळीतील एकाला बिहार (Bihar) राज्यातून अटक (Arrest) केली आहे.

बिशाल कुमार भरत मांझी Bishal Kumar Bharat Manjhi (वय-21 रा. लकरीखुर्द, लकरी दरगाह, सिवान, राज्य बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत फिर्यादी यांनी 18 मे 2023 रोजी पुणे सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीवर आयपीसी 419, 420, 34 सह आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Cyber Police News)

आरोपींनी फिर्यादी यांच्या कंपनीच्या मोबाईल नंबरवर 9395169771 व 600362772 या क्रमांकावरुन फोन व मेसेज केले. सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांना इन्फिनिटी डेवलपर्स प्रा. लि. (Infinity Developers Pvt. Ltd.) कंपनीचे संचालक (Director) बोलत असल्याचे भासवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. यानंतर फिर्यादी यांना कंपनीच्या अकाऊंटमधून JAMALUDDIN SHAIKH A/c No. 50100307953492HDFC 0000455 यामध्ये 9 लाख 80 हजार 506, BABAI DA 501005HDFC 000171 यामध्ये 35 लाख 90 हजार 308 रुपये तर TANKESWAR BORA 50200078HDFC 0009250 यामध्ये 20 लाख 70 हजार 408 रुपये ऑनलाइन असे एकूण 66 लाख 41 हजार 522 रुपये पाठवण्यास भाग पाडून आरोपींनी फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police News) दाखल गुन्ह्याचा तपास करताना आरोपींनी गुन्हा करताना वापरलेले मोबाईल व पेमेंट करण्यासाठी दिलेल्या लिंकचा व वेगवेगळ्या बँक खात्यांचा तांत्रिक तपास केला. त्यावेळी आरोपी बिहार राज्यातील सिवान जिल्ह्यातील इजमाली येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सायबर पोलिसांच्या पथकाने सिवान येथे जाऊन फिर्यादी यांना संपर्क करुन फसवणूक करणाऱ्या टोळीतील आरोपी बिशाल मांझी याला ताब्यात घेतले.

आरोपीचा 3 सप्टेंबर रोजी अपर मुख्य न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड (Transit Remand) घेऊन पुणे सायबर पोलीस
ठाण्यात आणण्यात आले. आरोपीला न्यायालयत हजर केले असता त्याला 11 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी
सुनावण्यात आली आहे. आरोपीकडून तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल, वेगवेगळ्या कंपनीचे सहा सीमकार्ड जप्त
केले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत (PI Chandrasekhar Sawant) करीत आहेत.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वर नमूद मोबाईल क्रमांकाचा वापर करुन कोणाची फसवणुक
झाली असेल तर अशा नागरिकांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात संपर्क करावा.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
आर्थिक व सायबर गुन्हे पोलीस उपायुक्त (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त आर.एन. राजे
(ACP R.N. Raje) यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुपे-पाटील (Senior PI Minal Supe-Patil),
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खरात (PSI Pramod Kharat), पोलीस अंमलदार वैभव माने,
अश्विनी कुमकर, शिरीष गावडे, प्रविण राजपूत, राजेश केदारी, दत्तात्रय फुलसुंदर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार अ‍ॅक्शन मोडवर, 10 लाखाची लाच घेणार्‍या बडया अधिकार्‍याची हकालपट्टी