Pune Cyber Police | आरोग्य पेपर फुटी प्रकरणात पोल्ट्री व्यावसायिकाला अटक; एजंट जीवन सानपसाठी उमेदवारांकडून गोळा करीत होता पैसे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Police | आरोग्य विभागाच्या ‘गट क’चा पेपर फुटीप्रकरणात (Health Department Examination Paper Leak Case) सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) एका पोल्टी व्यावसायिकाला अटक केली आहे. अतुल प्रभाकर राख Atul Prabhakar Rakh (वय ३०, रा. बीड) असे त्याचे नाव आहे.

 

याबाबत पोलिसांनी (Pune Cyber Police) दिलेल्या माहितीनुसार, जीवन सानप (Jeevan Sanap) हा आरोग्य विभागाच्या पेपर फुटीमध्ये एजंट म्हणून काम करत होता.
त्याच्या दोन भावांना अटक करण्यात आली आहे.
मात्र, जीवन सानप हा फरार आहे. अतुल राख हा पोल्ट्री व्यावसायिक (Poultry Business) असून जीवनचा मेव्हणा आहे.
तो आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठीच्या उमेदवारांकडून पैसे गोळा करुन ते जीवनकडे देत होता.
त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईल जप्त केला आहे.
अतुल राख याच्या मदतीने जीवन सानप याचा शोध घ्यायचा आहे.
त्याने किती उमेदवारांकडून पैसे गोळा केले, याचा तपास करायचा असून त्यासाठी त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

 

Web Title :- Pune Cyber ​​Police | Poultry trader arrested in Health Department Examination Paper Leak Case The agent was collecting money from candidates for Jeevan Sanap

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा