Pune Cyber Police | मॅट्रोमोनी साईटवरुन लाखोंचा गंडा घालण्याऱ्या दोन नायजेरियन आरोपींना दिल्लीतून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  मॅट्रोमोनी साईटद्वारे (Matromoni site) विवाहइच्छुकांना गंडा घालणाऱ्या दोन नायजेरीयन नागरिकांना (Nigerian citizens) पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) बेड्या ठोकल्या आहेत. पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) आरोपींना सोमवारी (दि.25) रात्री पावणे अकराच्या सुमारास दिल्लीतून अटक (Arrest from Delhi) केली आहे. आरोपींनी परदेशात नोकरी करत असल्याचे सांगून पुण्यातील महिलेची 12 लाखाची फसवणूक (Cheating) केली होती. हा प्रकार जून 2020 ते जुलै 2020 या कालावधीत घडला होता.

 

फसवणूक झालेल्या महिलने पुणे शहर सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
चिदिबेरे नवोसु उर्फ जेम्स नवोसु Chidibere Nwosu s/o James Nwosu (वय-36) ओकोरो बेसिल इफेनीचुकु उर्फ लेट क्लेक्सुकु Okoro Basil Ifeanyichukwu s/o Late Klecsukwu
(वय-41 दोघे रा. बी. 35, ओमिक्रॉन 1 ए, ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश, मूळ रा. नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
त्यांना सुरजपूरच्या न्यायालयात (Surajpur court) हजर केले असता न्यायालयाने त्यांची 29 ऑक्टोबर पर्यंत ट्रान्झिट रिमांड (Transit remand) मंजूर केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील (Pune City) एका महिलेची जून 2020 ते जुलै 2020 या कालावधीत विवाह संकेतस्थळावर अज्ञात व्यक्तीची ओळख झाली.
त्याने परदेशात नोकरी करत असल्याचे सांगितले.
त्यानंतर महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळी कारणे सांगून महिलेला दोन बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले.
आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून 12 लाख 19 हजार 949 रुपये घेऊन फसवणूक केली होती.
या गुन्ह्यामध्ये सायबर पोलिसांनी तात्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.
त्यावेळी आरोपी ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेशात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांच्या पथकाने (Pune Cyber Police) उत्तर प्रदेशात जाऊन आरोपींना अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे
(Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke), सहायक पोलीस आयुक्त विजय पळसुले (ACP Vijay Palsule),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस हाके (Senior Police Inspector D.S. Hake) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामणी (Police Inspector Ankush Chintamani),
सहायक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव (API Shirish Bhalerao), पोलीस उप निरीक्षक आनंदराव ढवळे (PSI Anandrao Dhawale), पोलीस अंमलदार अस्लम अत्तार,
योगेश वाव्हाळ, नितेश शेलार, वैभव माने, सौरभ घाटे, अंकिता राघो, शिरीष गावडे, मंगेश नेवसे, प्रविणसिंग राजपूत, यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Cyber Police | Pune Cyber ​​Police arrested Two Nigerian in Delhi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

NCB Officer Sameer Wankhede | आता ‘या’ तक्रारीमुळं समीर वानखेडेंच्या अडचणीत आणखी भर

Gold Price Today | धनत्रयोदशीपूर्वी सोन्यात झाली घसरण, मिळतंय 9000 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची खास भेट ! ऑक्टोबरच्या पगारात मिळणार ‘हे’ 3 भत्ते, जाणून घ्या किती मिळेल पगार