पुण्यातील वडगाव शेरी परिसरात सिलेंडरचा स्फोट ! आई-वडील आणि मुलगी जखमी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातील वडगाव शेरी परिसरात सिलेंडरचा स्फोट होऊन झालेल्या भीषण दुर्घटना घडली आहे. या घटनेत आईवडील आणि मुलगी जखमी झाले आहेत. आज पहाटे ही घटना घडली आहे. यात घराचे मोठे नुकसान झाले असून, मुलगी तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळली आहे.

बाळासाहेब आप्पासाहेब भोंडवे (वय 50), मीरा बाळासाहेब भोंडवे (वय 45) व अनुराधा बाळासाहेब भोंडवे (वय 21) असे जखमी झालेल्याची नावे आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

भोंडवे कुटुंबिय वडगाव शेरी परिसरातील गणेशनगर येथे राहते. तिसऱ्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट आहे. दरम्यान पहाटे सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास काम करत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की घराच्या भिंती देखील कोसल्या आहेत. त्यात अनुराधा ही तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळली. तर तिचे वडील आणि आई दोघेही यात गंभीर जखमी झाले आहेत. वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले आहे. नागरिकांनी व अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांना खडगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर घरातील आग विझवत पडलेली भिंत बाजूला काढली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून काम सुरू असल्याचे सांगण्यात येते.