बालेवाडी परिसरातील दुकानात 9 हुन अधिक सिलेंडरचा ‘स्फोट’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरातील बालेवाडी भागात दसरा चौकात लागलेल्या भीषण आगीत दुकानातील तबल 9 हुन अधिक सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फटाक्यांच्या आतीश बाजीपेक्षाही मोठे आवाज झाल्याचे सांगण्यात आले.

बालेवाडी परिसरातील दसरा चौकात एक दुकान आहे. या दुकानात लहान आणि मोठे सिलेंडर होते. पत्र्याच्या शेडमध्ये हे दुकान आहे. माहितीनुसार येथे अवैधरित्या मोठ्या सिलेंडरमधून बारक्या सिलेंडरमध्ये गॅस भरला जात असल्याची दाट शक्यता अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केली आहे. या ठिकाणी दोन इअर कॉम्प्रेशन मशीन देखील होत्या.

दरम्यान, शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक या दुकानातून धूर आला आणि काही वेळातच आग लागली. आगीनंतर अचानक सिलेंडरचे स्फोट होण्यास सुरुवात झाली.

अग्निशमन दलाला माहिती मिळताच चार फायर गाड्यांनी येथे धाव घेतली. मात्र तोपरियंत आगीने उग्ररूप धारण करत शेजारच्या दोन दुकानांना विळख्यात घेतले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यास सुरुवात केली. त्यावेळी एका दुकानातून फुटलेले मोठे व लहान सिलेंडर बाहेर काढले आहेत. त्यामुळे या सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याचे दिसून आले आहे.

नेमकी आग का कशी लागली आणि हे दुकान कोणाचे आहे याबाबत माहिती घेतली जात आहे.