Pune Dam Water Level | पुण्याच्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे 100 % भरली; 11 धरणे ‘ओव्हर फ्लो’

पुणे : Pune Dam Water Level | गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे १०० टक्के भरली असून धरणे पूर्ण भरल्याने त्यातून नदीत विसर्ग सुरु झाला आहे. खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) मुठा नदीत ६ हजार ८४८ क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. पावसाचा जोर वाढल्यास हा विसर्ग वाढण्याची शक्यता (Pune Dam Water Level) असून नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

भीमा खोर्‍यातील (Bhima Lake) खडकवासला (Khadakwasla), पानशेत (Panshet), वरसगाव (Varasgaon), टेमघर (Temghar), नीरा देवघर (Neera Deoghar), भाटघर (Bhatghar), वडज (Vadaj), कळमोडी (Kalmodi), चासकमान (Chaskaman), आंद्रा (Andra), पवना (Pavana) ही ११ धरणे १०० टक्के भरली असून या धरणांमधून नदीत पाणी सोडण्यात येत आहे. या धरणांमधून सोडण्यात येणारे पाणी शेवटी उजनी धरणात येत असते. दौंड येथे भीमा नदीतून सध्या १ लाख १७ हजार क्युसेस पाणी वाहत असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. येथील धोकापातळी १ लाख ५८ हजार क्युसेस आहे. जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्यात वाढ झाल्यास भीमा नदीला (Bhima River) पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उजनी धरणातील (Ujani dam) पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी सकाळपर्यंत उजनी धरणात ६७ टक्के पाणीसाठा झाला आहे.

Ajwain Water 5 Benefits | वजन कमी करायचे असो किंवा अनियमित मासिक पाळीची समस्या असो, रोज प्या ओव्याचे पाणी

मुळशी धरण (Mulshi Dam) ९४ टक्के भरले असून धरणातून सध्या २ हजार ७४७ क्युसेस पाणी मुळा नदीत (Mula River) सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणातून ६ हजार ८४८ क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. या दोन्ही नदीतून पाणी सोडण्यात येत असल्याने संगम पुलाजवळ हे पाणी एकत्र येते. त्यामुळे परिसरात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा

Gold Price Today | खुशखबर ! एक महिन्याच्या निच्चांकी स्तरावर सोन्याची किंमत, चांदीसुद्धा झाली स्वस्त; जाणून घ्या नवीन दर

Wipro Ends Work From Home | ‘विप्रो’ने 18 महिन्यानंतर बंद केले कर्मचार्‍यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’, 55 % कर्मचार्‍यांचं झालंय लसीकरण; आजपासून उघडली कार्यालये

Pune Crime | पुण्याच्या कात्रज घाटात प्रेम संबंधातून 32 वर्षीय महिलेचा चाकुने सपासप वार करून खून, प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Dam Water Level | All the four dams in Khadakwasla project in Pune are 100% full; 11 dam overflow

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update