मजुरांची माहिती घेण्यास डाटा इन्ट्री ऑपरेटर करतायत पोलिसांना मदत

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – परराज्यातील नागरिकांची माहिती पोलीस ठाणे स्थरावर घेतली जात असून, यासाठी परिमंडळ तीनमध्ये काही खासगी डाटा इन्ट्री ऑपरेटर पोलिसांना ही माहिती भरण्यास मदत करत आहेत. त्यामुळे पोलिसांचा ताण कमी झाला आहे. शहरात निम्याहून अधिक मजूर वर्ग याच परिसरात राहत असल्याचे कालच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहर लॉकडाऊन आहे. बाहेर पडण्यास मनाई आहे. त्यामुळे मजूर वर्गाची हाल सुरू झाले. तर सर्वचजण भीतीच्या छायेखाली आहेत. त्यामुळे आपआपल्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यानुसार परराज्यातील मजुरवर्गाला आपल्या गावी जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी शासनाने काही अटी आणि नियम घातले आहेत. त्यानुसार या मजुरांची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याच्या पातळीवर घेतली जात आहे. प्रथम दोन दिवस नेमकी माहिती कशी घ्यायची आणि ऑनलाइन माहिती घेण्यासाठी मोठी अडचण आली होती. स्थानिक पोलिसांना संचारबंदीचे काम करत हे आणखी काम आल्याने चांगलीच दमछाक झाली होती. तर मनुष्यबळ देखील कमी पडत होते.

त्यामुळे आता परिमंडळ टीमच्या उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी परिसरातील खासगी डाटा इन्ट्री ऑपरेटर यांची मदत घेतली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात हे ऑपरेटर या मजुरांची ऑनलाइन माहिती भरण्यासाठी पोलिसांना मदत करत आहेत. त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी झाला आहे.

तसेच प्रत्येक मजुरांचा एक गट केला आहे. त्यात एक गट प्रमुख करून त्यांना मजुरांची माहिती भरून आण्यास सांगितले आहे. ते माहिती भरून आणतात अंडी त्यांनतर माहिती भरली जाते. यामुळे गर्दी देखील होत नसल्याचे गायकवाड यांनी पोलिसनामाशी बोलताना सांगितले. तर हद्दीत रिक्षाना स्पीकर बसवून त्याद्वारे पोलिसांच्या काही सूचना असल्यास त्याची माहिती दिली जाते. तसेच मोठं-मोठ्या कलाकार यांच्या आवजात नागरिकांना कोरोना पासून कसे सावधान रहावे, काय काळजी घ्यावी असे डायलॉग व गाणी तयार केले आहेत. मिमक्री आर्टिस्ट यांची मदत घेतली आहे. ते देखील सर्व परिसरात रिक्षाद्वारे फिरवून नागरिकांना सूचना केल्या जातात.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना देखील परिमंडळ तीनमध्ये 6 पोलीस ठाणे आणि त्यांचा परिसर कोरोनामुक्त ठेवण्यास देखील यश मिळाले आहे. योग्य नियोजन, कडक अंमलबजावणी सोबतच स्थानिक नागरिकांना केलेले सहकार्य आणि नियमांचे पालन यामुळे येथील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही. त्याचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच परिसर यासाठी काळजी घेतली जात असल्याचे सांगितले.

6 हजार केसेस
शहरात संचारबंदी झाल्यानंतर परिमंडळ तीनमध्ये एकूण 6 हजार 100 जणांवर 188 नुसार कारवाई करण्यात आली आहे. तर या काळात 11 हजारहून अधिक वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत. तर अनेकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

पोलीस ठाणे, मजूर संख्या आणि गट

कोथरूड – 1120
वारजे —– 420
उत्तमनगर– 1357
सिहंगड रोड — 3505
दत्तवाडी —— 2898
अलंकार ——1389

परिमंडळ तीनमष्ये 170 विशेष पोलीस अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांची मदत नाकाबंदी ते पेट्रोलिंग आणि किराणा दुकान व तर ठिकाणची गर्दी कमी करण्यासोबतच त्याठिकाणी लाईन लावणे यासाठी होत आहे. आता त्यांना पोलिस कसे आणि काय काम करतात याचे प्रशिक्षण दिले जात आहे. पुढे गरज लागल्यास त्यांची आणखी मदत होईल यासाठी हे प्रशिक्षण देण्यात येत आहे, असे पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी सांगितले.