Pune : बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणार्‍याला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. स्वप्निल राजु चव्हाण (वय २४, रा. १३०, दंडेकर पुल) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी स्थानिक पोलीस व गुन्हे शाखा प्रयत्न करत आहे. पेट्रोलिंग, गुप्त माहिती काढली जात असून, त्यानुसार कारवाइ केली जात आहे. यादरम्यान दत्तवाडी पोलीस हद्दीत माहिती घेत असताना कर्मचारी शिवाजी क्षिरसागर व राहुल ओलेकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दांडेकर पुलाजवळ एकजण पिस्तुल घेऊन थांबला आहे.

या माहितीची खातरजमा करून वरिष्ठ निरीक्षक देवीसास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, कर्मचारी कुंदन शिदे, महेश गाढवे, अमित सुर्वे, सागर सुतकर, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, शरद राऊत, अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले, प्रमोद भोसले यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकून त्याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तुल व एक जिवंत काडतुस असा 30 हजार रुपयांचा ऐवज मिळून आला आहे. त्याने हे पिस्तुल कोठून आणि कशासाठी आणले याबाबत पोलीस तपास करत आहेत.

You might also like