दत्तवाडी पोलिसांनी मांजरीतल्या महिलेला केली मदत

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – दत्तवाडी पोलीस ठाण्यात येऊन एक महिला पासची मागणी करत होती. यावेळी तिला पोलिसांनी कशासाठी पास हवा आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी तिने मांजरीत राहत असलेल्या बहिनीच्या घरात खाण्याचे काहीही साहित्य नसून तिला मदत हवी असल्याचे सांगितले. त्यावेळी पोलिसांनी त्या महिलेला पास न देता तिच्या बहिनीचा पत्ता घेऊन अन्नधान्य घरी पाठवून मदत केली. पोलिसांचे आभार मानले.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून गेल्या ४० दिवसांपासून लॉकडाउन आहे. त्यामुळे मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांची अडचण झाली आहे. तर जवळ होता तो पैसा देखील संपला आहे. अनेक कुटुंबाला आता अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत.

मांजरीत राहणाऱ्या प्रतिभा बेलकरण या महिलेच्या घरातील अन्नधान्य संपले असल्याची माहिती तिने सहकारनगर परिसरात राहणाऱ्या बहिनीला दिली. तसेच, शेजाऱ्याकडून आतापर्यंत उसणे घेऊन घर भागविले. पण, आता कोणीही मदत करत नाही. त्यामुळे मला काही तरी मदत कर अशी विनंती तिने बहीन सपना डांबरे हिच्याकडे केली.

बहिणाला मदत करायची पण लॉकडाऊन असल्याने सपना डांबरे यांना जाता येत नव्हते. त्या दत्तवाडी पोलिस ठाण्यात आल्या व पोलिसांकडे पास देण्याची मागणी केली. यावेळी वरिष्ठ निरीक्षक देवीदास घेवारे यांनी तिच्याकडे पास कशासाठी हवा, याची विचारणा केली. महिलेने बहिनीचे कुटुंब अडचणीत असून तिला मदतीसाठी पास हवा असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या महिलेला तिच्या बहिनीचा पत्ता विचारून घेतला. “ताई तुम्ही जाण्याची गरज नाही, तुमच्या बहिणीचा मांजरी येथील पत्त्यावर सर्व जीवनावश्यक अन्नधान्य पोहच करू असे सांगितले. स्वतः ज्वारी, गहू पीठ, तांदूळ, डाळ तेल आशा वस्तू विकत घेऊन त्या सर्व वस्तू घेवून पोलिस कॉन्स्टेबल रेवननाथ जाधव यांना मांजरी येथे जाण्यास सांगितले. त्या नुसार जाधव हे आपले कर्तव्य संपल्या नंतर १९ किलोमिटर अंतरावर जावुन प्रतिमा बेलणकर यांच्या घरी सर्व वस्तू घेऊन गेले. डांबरे यांची मोठी अडचणी दत्तवाडी पोलिसांनी सोडवली. त्यांनी दत्तवाडी पोलिसांचे आभार मानले.