पुण्यातील वारजे ब्रिजखाली सापडला बॅगेत मृतदेह, परिसरात प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वारजे माळवाडी भागात ब्रिजखाली एका बॅगेत पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकार्यांसह वारजे माळवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. वारजे गावठाण येथील स्मशान भूमीजवळील ब्रिजखाली काही व्यक्तीं गेल्या असता त्यांना येथील उग्र वास येऊ लागला. त्यांनी याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली.

हि माहिती मिळताच वारजे पोलिस येथे दाखल झाले. त्यांनी बॅगेची तपासणी केली असता त्यात एक पुरुषाचा मृतदेह आढळून आला. हि माहिती वाऱ्या सारखी परिसरात पसरली. नागरिकांना हे पाहण्यासाठी तोबा गर्दी केली आहे. अग्निशामक व पोलिसांनी बागेतून बाहेर काढून शविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्याचे काम सुरु करण्यात येत आहे.

मयताची ओळख पटलेली नसून ओळख पटविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. याबाबत वारजे माळवाडी पोळीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कदम म्हणाले की , मृतदेह ३२ ते ३५ वयोगटातील आहे. खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह बॅगेत घालून पुलावरून टाकला असण्याची शक्यता आहे. अधिक तपास वारजे पोलीस करत आहेत.

Visit : Policenama.com