पुण्यात नदीपात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह; परिसरात खळबळ 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
Advt.

पुण्यात काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. नदीपात्रात खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला आहे. आज नदीपात्रात जवळपास साडेचार वाजण्याचा सुमारास एका अज्ञात इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आज पुण्यातील नद्यांमध्ये धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्राजवळील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच सततच्या  पावसामुळे पुण्यात ट्राफिक जाम झाले आहे. आज संध्याकाळी सुमारे साडे चार वाजण्याच्या सुमारास पोलीस नाईक खैरे याठिकाणी पेट्रोलिंग करीत होते. यावेळी त्यांना पाण्याच्या प्रवाहातून अज्ञात इसमाचा मृतदेह  पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यानंतर लगेचच अग्निशामक दलाला बोलावण्यात आले.

सध्या अग्निशामक दलाकडून हा मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. या ठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे. प्रथमदर्शी हा मृतदेह एका पुरुषाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. तर त्याचे साधारण वय ५० असल्याचे समजते आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा मृतदेह संगम ब्रिज पासून नदीपात्रात वाहत आलेला आहे. यावरून पाण्याचा प्रवाह खूप जास्त असल्याचे कळते . या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.
[amazon_link asins=’B06XFLY878,B01KSXQNLS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cef62a80-a53c-11e8-b3e2-e1047ec9778f’]