पुण्यातील सहकारनगर परिसरात रक्तानं माखलेला मृतदेह आढळल्यानं ‘खळबळ’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सहकारनगर परिसरातील लुंकड शाळेजवळील परिसरात तरुणाचा रक्ताने माकलेला मृतदेह आढळून आला आहे. त्याचा खून करून मृतदेह टाकला असण्याची शक्यता आहे.
रवी भारती (वय 36, रा. उत्तराखंड, सध्या. हडपसर) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आलेली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी भारती हा मुळचा उत्तराखंड येथील असून, तो हडपसर परिसरात एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी काही व्यक्तींना येथे मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ ही माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार, गुन्हे शाखेसह सहकारनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरूणाचा चेहर्‍यावर मारहाण करण्यात आल्याचे दिसत असून, मृतदेह रक्ताने माखलेला आहे. पोलिसांकडून मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल असे सांगण्यात येत आहे. अधिक तपास गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस करत आहेत.

Visit : Policenama.com