पुण्यातील डोंगरावर आढळला गळा चिरलेला मृतदेह

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील हिंजवडी माणच्या डोंगरावर अज्ञात तरुणाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरु आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी माण येथील एका मंदिराच्या मागील डोंगरावर अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या अज्ञात तरुणाचा गळा कापलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे.प्राथमिक माहितीवरून घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा प्रकार गुरुवारी मध्यरात्री घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पौड आणि हिंजवडी पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांना घटनास्थळावर दुचाकी आणि एक कार आढळून आलेली आहे. तसेच गळा कपलेला कटर, झुरळ मारण्याचे औषध, किटकनाशक असे साहित्य सादर ठिकाणी आढळून आले आहे. मृतदेहाच्या अंगावरील कपडे मृतदेहापासून बाजूला होते. घटनास्थळावरील वाहनांच्या नंबरवरुन मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.