पुणे : स्कूल बसच्या धडकेत दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

आईसोबत मोठ्या बहिणीला सोडवण्यासाठी आलेल्या एका दीड वर्षाच्या मुलीला स्कूलबसची धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलीला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही दुर्दैवी घटना आज (बुधवार) सकाळी आठच्या सुमारास शिक्रापूर भागात घडली.

श्रध्दा एकनाथ दिरघट्टी (वय- दीड वर्षे) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे.

आज सकाळी आठच्या सुमारास श्रद्धा तीच्या आईसोबत मोठ्या बहिणीला सोडवण्यासाठी सोसायटीच्या गेटजवळ आली होती. आईने मोठ्या मुलीला बसमध्ये सोडले. त्यावेळी श्रद्धा बसच्या समोर गेली. चालत्या बसचा तिला धक्का लागल्याने ती खाली पडली. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तिला मयत घोषित केलं. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस अधिक तपास करत आहेत.