पावसामुळे दत्तवाडीत संरक्षण भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात आज झालेल्या पावसामुळे दत्तवाडीमध्ये घराची संरक्षण भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संगीता नितीन रणदिवे (रा. जनता वसाहत, शंकर मंदिर) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संगीता रणदिवे हि महिला कचरा वेचण्याचे काम करत होती. आज सायंकाळी मुसळाधार पाऊस पडल्याने दत्तवाडी येथील संरक्षण भिंत कोसळली. ही भिंत संगिता रणदिवे यांच्या अंगावर पडून गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

भिंतीजवळ राडारोडा टाकण्यात आल्याने आणि पावसाच्या पाण्यामुळे भिंत कोसळल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच संगिता रणदिवे यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आरोग्य विषयक वृत्त –
या’ घरगुती उपायांनी काळ्या ओठांना बनवा मऊ आणि गुलाबी
पाठदुखी का होते ? जाणून घ्या कारणे, करा हे उपाय
‘या’ गोष्टी फॉलो करा आणि निकालाचे नैराश्य घालवा
या ‘शॉर्टटर्म’ व्यायाम प्रकारांचे अनुभवा ‘लॉंगटर्म’ फायदे